एलफिन्स्टन दुर्घटनेबद्दल बाॅलिवूड सेलिब्रिटींच्या सहवेदना

एलफिन्स्टन दुर्घटनेबद्दल बाॅलिवूड सेलिब्रिटींच्या सहवेदना

  • Share this:

29 सप्टेंबर : एलफिन्स्टन पुलाच्या दुर्घटनेनंतर सगळ्यांनाच धक्का बसला. सगळे हळहळले. त्यात आपले बाॅलिवूड सेलिब्रिटीजही होते.

अनेकांनी ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्यात. जाॅन इब्राहिमनं म्हटलंय, मी पूर्वी ट्रेननं प्रवास करायचो. ज्या स्टेशनवरून जायचो, त्याची ही अवस्था पाहून वाईट वाटतंय. मृत व्यक्तींच्या कुटुंबासाठी आम्ही प्रार्थना करतो.

रितेश देशमुख म्हणतो, कमकुवत बांधकाम, जास्त भार म्हणजे टाईम बाँबच. ही वेळ धडा शिकण्याची आहे. रितेशनं त्याच्या फास्टर फेणे सिनेमाचं आज होणारं ट्रेलर लाँचही पुढे ढकललंय.

बोमन इराणीनं ट्विट केलंय, भीतिदायक, दु:खद, टाळता येण्यासारखं.

अनुपम खेर म्हणतो, हे ऐकून दु:खी झालो, भीती वाटली, माझी प्रार्थना आणि श्रद्धांजली.

सचिन तेंडुलकरची मुलगी सारानंही आपल्या भावना व्यक्त केल्यात. ती म्हणते, या घटनेनं मी दु:खी झालीय.

First published: September 29, 2017, 8:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading