SSR Death Case: सिद्धार्थ पिठानी, नीरज सिंह आणि दीपक सावंतची पुन्हा होणार CBI चौकशी

SSR Death Case: सिद्धार्थ पिठानी, नीरज सिंह आणि दीपक सावंतची पुन्हा होणार CBI चौकशी

सीबीआयने सुशांतच्या फ्लॅटमध्ये राहणारे सिद्धार्थ पिठानी (Siddharth Pithani), कुक नीरज सिंह (Neeraj Singh) आणि हाऊस हेल्पर दीपक सावंत (Deepak Sawant) यांना मंगळवारी पु्न्हा एकदा चौकशीकरता बोलावले आहे.

  • Share this:

मुंबई, 25 ऑगस्ट : सीबीआयने (CBI) सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा (Sushant Singh Rajput Death Case) तपास वेगाने सुरू केला आहे. सीबीआयने सुशांतच्या फ्लॅटमध्ये  राहणारे सिद्धार्थ पिठानी (Siddharth Pithani), कुक नीरज सिंह (Neeraj Singh) आणि हाऊस हेल्पर दीपक सावंत (Deepak Sawant) यांना मंगळवारी पु्न्हा एकदा चौकशीकरता बोलावले आहे.

एका अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सिद्धार्थ पिठानी, नीरज आणि सावंत सांताक्रुजमध्ये कलिना याठिकाणी असणाऱ्या डीआरडीओच्या गेस्ट हाऊसमध्ये पोहोचले आहेत, ज्याठिकाणी या प्रकरणाचा तपास करणारे सीबीआयचे अधिकारी थांबले आहेत. हे तीनही व्यक्ती वांद्रे येथील मोंट ब्लँक (Mont  Blanc) अपार्टमेंटमधील सुशांतच्या घरामध्ये उपस्थित होते. ज्यादिवशी 34 वर्षीय सुशांत याच राहत्या घरामध्ये त्याच्या खोलीमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला होता.

(हे वाचा-'सुशांतच्या खोलीत कुणी येऊ शकत नव्हतं', CBI रिक्रिएशनमध्ये गोष्टींचा उलगडा)

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांची एक टीम देखील सकाळी डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये पोहोचली आहे. त्यांनी अशी माहिती दिली की, सुशांतच्या आर्थिक व्यवहारांबाबतत माहिती गोळा करण्यासाठी त्याचा सीए आणि अकाउंटंटला देखील बोलवण्यात आले होते. सोमवारी सीबीआयच्या टीमने मुंबई स्थित त्या रिसॉर्टचा देखील दौरा केला होता, ज्याठिकाणी सुशांतने काही महिने घालवले होते आणि पिठानीस नीरज व सावंतची चौकशी देखील केली होती.

(हे वाचा-SSR Case: शिबानी दांडेकर मिस्ट्री गर्ल असल्याचा दावा, भडकली फरहानची गर्लफ्रेंड)

सीबीआय अधिकाऱ्ंयांनी शुक्रवारी पिठानी आणि नीरजचा जबाब नोंदवला होता. शनिवारी या पथकाने पिठानी, नीरज आणि सावंतला सुशांतच्या फ्लॅटवर नेले होते. त्यानंतर सुशांतच्या मृत्यूच्या वेळी झालेल्या घटना अनुक्रमे रिक्रिएट करण्यात आल्या. रविवारी पुन्हा एकदा त्यांना फ्लॅटवर नेण्यात आले होते आणि सीबीआयने डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये त्यांची चौकशी केली.

सर्वोच्च न्यायालयाने सुशांतच्या आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याबाबत अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) विरोधात त्याचे वडील केके सिंह (KK Singh) यांनी दाखल केलेली एफआयआर सीबीआयकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय कायम ठेवला होता.

Published by: Janhavi Bhatkar
First published: August 25, 2020, 3:11 PM IST

ताज्या बातम्या