ना 'बाबुजी', ना 'संस्कारी'... लैंगिक शोषणाचे आरोपी आहेत 'हे' सेलिब्रिटीज

नाना पाटेकरांवर तनुश्री दत्तानं लैंगिक गैरवर्तनाचा आरोप केला. पण आतापर्यंत अनेक बाॅलिवूड सेलिब्रिटीजवर असे आरोप आहेत.

  • Share this:

सिनेसृष्टीतील संस्कारी अभिनेत्याने माझ्यावर बलात्कार केला असल्याचा आरोप लेखिका विनता नंदा यांनी केला आहे. 20 वर्षांपूर्वी एका पार्टीनंतर ते विनता नंदाच्या घरी तिला सोडायला गेले आणि तिथे त्यांनी बलात्कार केला. या सगळ्या प्रकरणात संशयाची सुई ही आलोक नाथ यांच्यावर आहे.

रजत कपूरवर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप लागल्यानंतर त्यानं ट्विटरवरून जाहीर माफी मागितली आहे. एका महिला पत्रकारानं लिहिलंय की महिला पत्रकार आहे. तिनं फोनवरून मुलाखत घेताना त्यानं तिला विचारलं, तुझ्या आवाजाएवढीच तू सेक्सी आहे का? मधे मधे तो असंच काही बोलत होता.

विकास बहलवर 'बाँबे व्हेलवेट'च्या एका क्रू मेंबरनं लैंगिक शोषणाचा आरोप केलाय. शिवाय बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने सिने दिग्दर्शक विकास बहलवर जबरदस्ती केल्याचा गंभीर आरोप केला आहे. 'क्वीन' सिनेमाच्या शूटिंगवेळी विकास बहलने मला जबरदस्ती केल्याचा आरोप कंगनाने केला आहे.

AIB चा सदस्य उत्सव चक्रवर्तीवर लैंगिक शोषणाचा आरोप झाला. उत्सववर एका महिला सहकाऱ्याने गंभीर आरोप केला होता. ती स्त्री इंटर्न होती. तिच्याकडे त्यानं न्यूड फोटोज मागितले असा त्याच्यावर आरोप आहे.

तनुश्री-नाना प्रकण तर गाजतंच आहे. 2008 मध्ये 'हाॅर्न ओके प्लीज' या सिनेमाच्या सेटवर नाना पाटेकर यांनी माझ्यासोबत गैरव्यवहार केला होता. मी त्यांना विरोध केला. पण त्यांनी याचा बदला घेण्यासाठी संपूर्ण चित्रपटात मला त्रास दिला, असा दावा तनुश्री दत्तानं केला होता.

अभिनेता जितेंद्रवर 90च्या दशकात जबरदस्ती केल्याचा आरोप केला. ती त्याची कझिन असल्याचाही तिनं दावा केला होता. जितेंद्र आणि एकता कपूरनं आरोप फेटाळले होते.

अभिनेता इरफान खानवर ममता पटेल नावाच्या अभिनेत्रीनं जबरदस्ती केल्याचा आरोप केलेला. तिनं पानसिंग तोमरमध्ये काम केलं होतं. इरफाननं चांगल्या भूमिका देऊ सांगत जबरदस्ती केलेली, असा तिनं दावा केला होता.

बाॅलिवूड व्हिलन शक्ती कपूरवर तर अनेक जणींनी शोषणाचे आरोप केलेत. एक ज्युनियर अभिनेत्रीनं मीडियासमोर आरोप केला होता की सिनेमा देतो हे सांगून जबरदस्ती केली होती.

शायनी आहुजाची गोष्ट तर सगळ्यांना ठाऊक आहे. त्याच्या घरी काम करणाऱ्या महिलेनंच त्याच्यावर बलात्काराचा आरोप केलेला. त्याला तुरुंगाची हवाही खावी लागली. नंतर महिलेनं आरोप मागे घेतला. पण त्याला सिनेमे मिळणं बंद झालं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 9, 2018 03:08 PM IST

ताज्या बातम्या