Video : संजय दत्तच्या मुलाचा प्रश्न ऐकलात तर तुम्ही नक्कीच इमोशनल व्हाल

Video : संजय दत्तच्या मुलाचा प्रश्न ऐकलात तर तुम्ही नक्कीच इमोशनल व्हाल

दिवाळी संपली. बाॅलिवूडच्या कलाकारांच्या दिवाळी सेलिब्रेशनचे फोटोज व्हायरल होतायत. एका स्टारचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय.

  • Share this:

मुंबई, 10 नोव्हेंबर : दिवाळी संपली. बाॅलिवूडच्या कलाकारांच्या दिवाळी सेलिब्रेशनचे फोटोज व्हायरल होतायत. एका स्टारचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. तो पाहून तुम्हीही इमोशनल व्हाल.

अभिनेता संजय दत्तच्या घरीही दिवाळीची पार्टी झाली. यावेळी फोटोग्राफर्स संजय दत्त, मान्यता आणि त्यांच्या जुळ्या मुलांचे फोटो काढत होते. त्यावेळी मुलगा सहराननं सगळ्यांना असा काही प्रश्न विचारला की सगळे इमोशनल झाले.

संजय दत्तनं मुलाला जवळ घेऊन फोटोग्राफर्सना हा प्रश्न विचार, म्हणून सांगितलं. तसा त्यानं तो विचारला. सहरान म्हणाला, तुम्ही पाणी प्यायलं का? आई-वडील मुलांवर कळत नकळत संस्कार करत असतात. संजय दत्तनं तेच केलेलं दिसलं. हा व्हिडिओ व्हायरल होतोय.

बाॅलिवूड अभिनेता संजय दत्त मराठी सिनेमाची निर्मिती करतोय. स्वत: त्यानं ट्विट करून ही माहिती दिलीय. ब्लूमस्टँग प्राॅडक्शनसोबत संजय दत्त हा मराठी सिनेमा निर्मित करतोय. या सिनेमात अभिजीत खांडकेकर, दीपक धोब्रिया, स्पृहा जोशी आणि नंदिता धुरी यांच्या भूमिका आहेत. सिनेमाचं अजून नाव ठरायचंय. पण शूटिंग सुरू आहे.

काही महिन्यांपूर्वी संजय दत्तवरचा सिनेमा संजू रिलीज झाला आणि बाॅक्स आॅफिसवर सुपरडुपर हिट ठरला. याशिवाय प्रस्थानम या तेलगू सिनेमाचा हिंदी रिमेकची निर्मिती तो करतोय. या सिनेमाचं मोशन पोस्टर रिलीज झालं. सिनेमाचा मुहूर्त नर्गिसच्या जन्मदिनी झाला होता. तर सिनेमाचं शूटिंग सुनील दत्त यांच्या जन्मदिनी सुरू केलं होतं. प्रस्थानम सिनेमात संजय दत्तची मुख्य भूमिका आहे.

नागराजच्या ‘नाळ’ला शनाया देणार टक्कर

रणवीर सिंगला भेटायचंय 'या' मराठी अभिनेत्रीला!

#MeToo : 'दरवाजा उघडताच नवाजनं मला बळजबरीनं मिठी मारली'

संजू सिनेमात नर्गिसची भूमिका करणारी मनीषा कोईरला या सिनेमात संजय दत्तबरोबर आहे. ती संजय दत्तच्या पत्नीची भूमिका करतेय.

हक्क दिलात तर रामायण सुरू, खेचून घेतलंत तर महाभारत, ही सिनेमाची कॅचलाईन. सिनेमात जॅकी श्रॉफ, अमायरा दस्तूर, चंकी पांडे, अली फजल यांच्याही भूमिका आहेत. तेलगू प्रस्थानमचा दिग्दर्शक देवा कट्टा हा सिनेमा दिग्दर्शित करणार आहे. सिनेमाचं बरंचसं शूटिंग लखनौला होणार आहे.

First published: November 10, 2018, 5:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading