Big Boss 12 : ग्रँड फिनालेत सलमानसोबत असणार 'हा' स्टार

Big Boss 12 : ग्रँड फिनालेत सलमानसोबत असणार 'हा' स्टार

बिग बाॅस 12चा सीझन सुरू आहे. शोमध्ये जसलीन-अनुप जलोटांनी जान आणली होती. आताही त्यात बऱ्याच घटना घडतायत. या शोचा ग्रँड फिनाले आहे 30 डिसेंबरला.

  • Share this:

मुंबई, 10 नोव्हेंबर : बिग बाॅस 12चा सीझन सुरू आहे. शोमध्ये जसलीन-अनुप जलोटांनी जान आणली होती. आताही त्यात बऱ्याच घटना घडतायत. या शोचा ग्रँड फिनाले आहे 30 डिसेंबरला. यावेळी एक मोठा कलाकार उपस्थित असणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार शोमध्ये रोहित शेट्टीसोबत एक स्टार येणार आहे. तो आहे अभिनेता रणवीर सिंग. रोहित शेट्टीच्या खतरों के खिलाडीचा नवा सीझन 5 जानेवारीपासून सुरू होणार. त्याची घोषणा या फिनालेत होईल, असं म्हटलं जातंय. त्यामुळे सलमान, रणवीर यांची जुगलबंदी चांगलीच रंगणारेय.

रणवीर-दीपिकाची लगीनघाई आता सुरू झालीय. 14 आणि 15 नोव्हेंबरला लग्नाचे सोहळे होणार आहेत.

एका मुलाखतीत दीपिकाला विचारलं होतं. रणवीरचं पहिलं इम्प्रेशन कसं होतं? या प्रश्नावर दीपिका म्हणाली, ' त्याचा बँड बाजा बारात सिनेमा मी पाहिला होता. त्यावेळी माझा एजंट म्हणाला हा मोठा स्टार बनेल. पण मीच म्हटलं, मला नाही असं वाटत.'

एवढंच नाही, तर दीपिकानं सांगितलं, रणवीर तिच्या टाइपचा नाही. पण त्याचा अभिनय पाहून मी प्रभावित झालीय. त्यानं दिल्लीच्या मुलाचा अभिनय इतका तंतोतंत केला की मला माहीतच नव्हतं तो मुंबईचा आहे म्हणून.

दीपिका जेव्हा एका रेस्टाॅरंटमध्ये रणवीरला भेटली, तेव्हा तिनं त्याला विचारलं की तू मुंबईला शिफ्ट झालास का? त्यावेळी रणवीर आपल्या आई-वडिलांबरोबर डिनरला आला होता. दीपिकाला पाहून तो आईच्या कानात कुजबुजला, ही माझी आवडती हिराॅइन. मी हिचा फॅन आहे.

दीपिका म्हणते, प्रेमात फक्त शारीरिक जवळीक जरुरी नसते. तर मनं जुळावी लागतात. एकमेकांना समजून घ्यावं लागतं. पण सगळे असा विचार नाही करत.

 VIDEO 'हे भगवान', 'गर्ल पॉवर' अशी व्हॉट्सअॅपची भन्नाट स्टिकर वापरायची कशी?

 

First published: November 10, 2018, 9:37 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading