अमिताभ बच्चन यांच्या मंदिरातही साजरा झाला वाढदिवस, झालं बच्चन चालीसाचं वाचन

अमिताभ बच्चन यांच्या मंदिरातही साजरा झाला वाढदिवस, झालं बच्चन चालीसाचं वाचन

कोलकातामध्ये असणाऱ्या अमिताभ बच्चन यांच्या मंदिरात (Amitabh Bachchan Temple) त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. याठिकाणी आधी हवन करण्यात आले, त्यानंतर अमिताभ बच्चन चालीसाचे पठण करण्यात आले. बच्चन यांची आरती देखील झाली.

  • Share this:

मुंबई, 12 ऑक्टोबर : बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आता 78 वर्षांचे झाले आहेत. रविवारी 11 ऑक्टोबर रोजी त्यांनी सर्व बच्चन कुटुंबीयांबरोबर वाढदिवस (Amitabh Bachchan 78th birthday) साजरा केला. अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्या सर्व चाहत्यांचे आणि शुभचिंतकांचे आभार देखील मानले. संपूर्ण देशभरात या महानायकाचा वाढदिवस साजरा केला गेला. मात्र काही ठिकाणी अमिताभ बच्चन यांच्या केवळ एक उत्तम अभिनेता म्हणून नाही तर देव मानून मानसन्मान केला जातो. कोलकातामध्ये अमिताभ बच्चन यांचे एक मंदिर देखील आहे. याठिकाणी देखील त्यांचा वाढदिवस साजरा केला आहे. कोरोना प्रोटोकॉल्सचे पालन करत बिग बींचा वाढदिवस साजरा केला गेला.

या मंदिरात दरवर्षी मोठ्या उत्साहाने अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस साजरा केला जातो. याठिकाणी हवन , पूजा झाल्यानंतर केक कापला जायचा. मात्र यंदा कोरोना व्हायरसमुळे वेगळ्या पद्धतीने अमिताभ यांचा वाढदिवस साजरा केला गेला.

(हे वाचा-टीव्हीची प्रसिद्ध खलनायिका लवकरच होणार आई, शेअर केला नवऱ्याबरोबरचा क्यूट VIDEO)

याठिकाणी सर्वात आधी अमिताभ बच्चन चालीसा पठण करण्यात आले. त्यानंतर बच्चन यांची आरती म्हणण्यात आली. यानंतर कोरोनामुळे निर्माण झालेल्या समस्या लक्षात घेता, या समस्यांशी लढा देणाऱ्या बिग बींच्या चाहत्यांना एक हजार मास्क, सॅनिटायझर आणि रेशन वाटण्यात आले.

View this post on Instagram

.. your generosity and love be the greatest gift for me for the 11th .. I cannot possibly ask for more ..🙏🙏🙏

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan) on

कोलकातामध्ये अमिताभ बच्चन यांचे फॅन्स त्यांना 'गुरू' म्हणून संबोधतात. याठिकाणी 2001 मध्ये हे मंदिर बांधण्यात आले होते. ज्यानंतर दरवर्षी याठिकाणी मोठ्या धुमधडाक्यात वाढदिवस साजरा करण्यात आला. याठिकाणी हवन-पूजेबरोबरच भंडारा देखील आयोजित केला जातो. कोरोना व्हायरसमुळे यंदा छोटेखानी स्वरूपात वाढदिवस साजरा करण्यात आला.

Published by: Janhavi Bhatkar
First published: October 12, 2020, 8:59 AM IST

ताज्या बातम्या