मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

कियारा आडवाणी स्वतःला समजते अंधश्रद्धाळू, कधीच करत नाही 'ही' गोष्ट

कियारा आडवाणी स्वतःला समजते अंधश्रद्धाळू, कधीच करत नाही 'ही' गोष्ट

नुकतंच Kiara Advani चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कार्तिक आर्यन  (Kartik Aryan)  आणि चित्रपटाच्या टीमसोबत 'द कपिल शर्मा शो'च्या   (The Kapil Sharma Show)  सेटवर पोहोचली होती. जिथे अभिनेत्रीने सांगितले की ती एका गोष्टीसाठी अंधश्रद्धाळू आहे. आणि म्हणून ती 'ही' गोष्ट कधीच करत नाही.

पुढे वाचा ...
  • Published by:  Aiman Desai
मुंबई, 12 मे-   बॉलिवूडमध्ये   (Bollywood)  काही अभिनेत्री अशा आहेत ज्यांनी फारच कमी वेळेत आपलं कौशल्य सिद्ध केलं आहे.  आणि मनोरंजन सृष्टीत आपली एक खास ओळख निर्माण केली आहे. त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे कियारा आडवाणी  (Kiara Advani) होय. कियारा अडवाणी सध्या तिच्या व्यावसायिक आणि खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. नुकतंच ती 'शेरशाह' फेम अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत अफेअर आणि नंतर ब्रेकअपच्या बातम्यांमुळे चर्चेत आली होती. दरम्यान आता ती तिच्या आगामी 'भूल भुलैया 2' (Bhool Bhulaiyaa 2) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकतंच ती चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कार्तिक आर्यन  (Kartik Aryan)  आणि चित्रपटाच्या टीमसोबत 'द कपिल शर्मा शो'च्या   (The Kapil Sharma Show)  सेटवर पोहोचली होती. जिथे अभिनेत्रीने सांगितले की ती एका गोष्टीसाठी अंधश्रद्धाळू आहे. आणि म्हणून ती 'ही' गोष्ट कधीच करत नाही. अभिनेत्री कियारा आडवाणी 'कबीर सिंह' आणि 'शेरशाह'सारख्या चित्रपटांमुळे खास प्रसिद्धीत आली होती. त्यांनतर अभिनेत्रींच्या हातात अनेक चांगले प्रोजेक्टस आहेत. नुकतंच 'भूल भुलैया 2' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती कपिल शर्माच्या सेटवर पोहोचली होती. जिथे तिच्यासोबत कार्तिक आर्यन, राजपाल यादव आणि चित्रपटाचे दिग्दर्शक अनीस बज्मी देखील उपस्थित होते. कियाराने सोशल मीडियावर एक गुपित उघड केलं आहे. आणि या गोष्टीसाठी ती स्वत:ला अंधश्रद्धाळू समजते. द कपिल शर्मा शोच्या सेटवर कपिलसोबत बोलताना कियाराने मान्य केलं की, एक गोष्ट वगळता तिचा कोणत्याच अंधश्रद्धेवर विश्वास नाही. त्या एका गोष्टीबाबत सांगताना ती म्हणाली, ''पण हो... मी चित्रपट साइन करेपर्यंत कोणालाच सांगत नाही''. असं म्हणत अभिनेत्रीने आपलं गुपित उघड केलं आहे. 'भूल भुलैया 2' हा प्रियदर्शनच्या 2007 मध्ये आलेल्या याच नावाच्या हॉरर कॉमेडी चित्रपटाचा सिक्वेल आहे. 'भूल भुलैया' या चित्रपटात अक्षय कुमार, विद्या बालन आणि शायनी आहुजा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. 'भूल भुलैया 2' 20 मे रोजी रिलीज होणार आहे.
कियाराबद्दल सांगायचं तर, तिने 'फगली' या कॉमेडी चित्रपटातून तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर एमएस धोनीची बायोपिक 'एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी', मध्ये तिने महत्वाची भूमिका साकारून सर्वांचं लक्ष वेधलं होतं. या चित्रपटामुळे कियाराला चाहत्यांचं प्रचंड प्रेम मिळालं होतं. यानंतर 'लस्ट स्टोरीज' 'कबीर सिंह' आणि 'शेरशाह' यांसारख्या चित्रपटातून तिला प्रेक्षकांची पसंती मिळाली. कियाराने तेलुगू पॉलिटिकल थ्रिलर 'भारत अने नेनू' मध्येही काम केलं आहे.सध्या अभिनेत्री सिद्धार्थ मल्होत्रासोबतच्या रिलेशनशिपमुळेसुद्धा सतत चर्चेत असते.
First published:

Tags: Entertainment, Kartik aryan, Kiara advani, The kapil sharma show, Upcoming movie

पुढील बातम्या