Home /News /entertainment /

Manoj Bajpai Birthday: बॉलिवूडचा भिकू म्हात्रे झाला 52 वर्षांचा; एकेकाळी केला होता आत्महत्येचा विचार

Manoj Bajpai Birthday: बॉलिवूडचा भिकू म्हात्रे झाला 52 वर्षांचा; एकेकाळी केला होता आत्महत्येचा विचार

बॉलिवूड अभिनेता मनोज बायपेयीचा आज 52 वा वाढदिवस (Manoj bajpai Birthday) आहे. खरंतर आज मनोज बायपेयी यशाच्या शिखरावर पोहचला आहे. पण त्याचा हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. त्याला संघर्षाच्या काळात अनेक अपयशाचा सामना करावा लागला आहे.

    मुंबई, 23 एप्रिल: बॉलिवूड अभिनेता मनोज बायपेयीला (Manoj Bajpai) काही दिवसांपूर्वी 'भोंसले' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. त्याने आतापर्यंत अनेक चित्रपटात खमक्या भूमिका साकारल्या असून दर्शकांच्या मनात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशा या गुणी अभिनेताचा आज 52 वा वाढदिवस (Manoj bajpai Birthday) आहे. खरंतर आज मनोज बायपेयी यशाच्या शिखरावर पोहोचला आहे. पण त्याचा हा इथपर्यंतचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. अनेकदा अपयशाचा सामना केल्यानंतर त्याने इथपर्यंत मजल मारली आहे. त्याचं आयुष्य अपयशानं इतक भरलं होतं की, एकेकाळी त्याच्या मनात आत्महत्येचा (Manoj Bajpai thought to commits suicide) विचारदेखील आला होता. या परिस्थितीतही त्याने हार न मानता आपल्या कामात सातत्य ठेवलं. अपयशाला कवटाळून न बसता त्यानं त्यातून धडे घेत पुढचा प्रवास निश्चित केला आहे. त्यामुळे तो आज बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट कलाकार ठरला आहे. त्याच्या कामाचं अनेक स्तरातून कौतुक होतं आहे. मनोज बायपेयीनं सध्या आर्ट सिनेमांपासून वेबसीरिजपर्यंत सर्वच क्षेत्रात आपल्या अभिनयाचा दबदबा निर्माण केला आहे. पण इथपर्यंत पोहचण्याचा त्याचा संघर्ष अजिबात सोपा नव्हता. चला तर मग जाणून घेऊया त्याच्या आयुष्यातील काही रोचक तथ्ये... 1. मनोज बाजपेयीचा जन्म आजच्या दिवशी 1969 साली एका सर्वसाधारण शेतकरी कुटुंबात झाला होता. त्यावेळी त्याचे आई वडिल बिहारमधील नरकटीयागंज याठिकाणी राहायला होते. 2. मनोज बायपेयी हा एक अतिशय अष्टपैलू आणि गुणी अभिनेता आहे. त्याने सर्व प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच त्याने बर्‍याच भाषांमध्ये काम केलं आहे. 3. मनोज बायपेयीने 1994 साली 'द्रोहकाल' या चित्रपटातून बॉलिवूड इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. या चित्रपटात त्याची भूमिका खूपच लहान होती. पण त्यापूर्वी त्याने बराच काळ संघर्ष केला होता. 4. 2013 मध्ये टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत मनोज बायपेयीनं आपल्या संघर्षाविषयी सांगितलं आहे. संबंधित मुलाखतीत त्याने सांगितलं होत की, त्याने एकेकाळी आत्महत्येचा विचार केला होता. 5. त्याने पुढं सांगितलं की, त्याला लहानपणापासून हिरो व्हायची इच्छा होती. यामुळे त्याने वयाच्या 17 व्या वर्षी बिहारमधील बेतिया हे गाव सोडलं आणि दिल्लीला आला. याठिकाणी आल्यानंतर त्याने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (एनएसडी) मध्ये प्रवेश घेण्याचा विचार केला. त्याने तीन वेळा एनएसडीमध्ये प्रवेश घेण्यासाठी फॉर्म भरला, परंतु काही कारणांमुळे तो तीनही वेळा नाकारला गेला. हे ही वाचा- या मुस्लिम अभिनेत्रीशी मनोज वाजपेयीने केलं होतं दुसरं लग्न 6. तीन वेळा अपयश आल्यामुळे तो पार खचून गेला. आपलं स्वप्न पूर्ण होऊ शकणार नाही, या विचाराने आत्महत्येचा विचारही केला. पण त्याच्या या कठीण काळात त्याच्या मित्रांनी त्याला मोलाची साथ दिली. 7. दरम्यान अभिनेता रघुवीर यादव यांच्या सांगण्यावरून, मनोज बायपेयीनं बॅरी जॉनच्या वर्कशॉपला हजेरी लावली. यावेळी बॅरी जॉन मनोज बाजपेयीच्या प्रतिभेवर इतका खूश झाला की, त्याने मनोजला त्याचा सहाय्यक बनवलं. 8. यानंतर त्याने पुन्हा एनएसडीला प्रवेश घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याला नशिबाने साथ दिली आणि त्याला एनएसडीमध्ये प्रवेश मिळाला. 9. त्याने अनेक वर्ष संघर्ष केला असला तरी आज तो इंडस्ट्रीतील सर्वोत्कृष्ट कलाकारांमध्ये गणला जातो. त्याने अगदी बॉलिवूडपासून वेब वेब सीरीजमध्ये आपल्या अभिनयाची चमक दाखवली आहे. 10. मनोज बाजपेयी मते, तुमच्याकडे काम आहे की नाही हे महत्त्वाचं नाही. पण त्यासाठी अभिनय कौशल्ये विकसित करणं महत्त्वाचं आहे. कारण तुमच्याकडे जर अभिनय कौशल्ये असेल तर तुम्हाला हमखास काम मिळेल. त्यासाठी एखाद्या अभिनेत्याचा मुलगा असणं गरजेचं नाही.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Birthday celebration, Bollywood actor, Manoj Bajpayee

    पुढील बातम्या