Home /News /entertainment /

VIDEO: पार्टी करण जोहरची चर्चा मात्र 'या' मुलीची, सलमान खानशी आहे जवळचं नातं

VIDEO: पार्टी करण जोहरची चर्चा मात्र 'या' मुलीची, सलमान खानशी आहे जवळचं नातं

नुकतंच करण जोहरने आपला 50 वा वाढदिवस (Karan Johars 50th Birthday Bash) साजरा केला. यावेळी त्याने रॉयल पार्टीचं आयोजन केलं होतं. यामध्ये अनेक बड्या बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. मात्र यावेळी एका व्यक्तीने चांगलंच लक्ष वेधलं होतं.

पुढे वाचा ...
  मुंबई, 26 मे-  बॉलिवूड   (Bollywood)  कलाकार नेहमीच आपल्या रॉयल लाईफस्टाईल आणि आलिशान पार्ट्यांसाठी ओळखले जातात. काही कलाकार असे आहेत, जे आपल्या प्रत्येक वाढदिवसाला जंगी पार्टीचं आयोजन करतात. त्यातीलच एक नाव म्हणजे निर्माता-दिग्दर्शक करण जोहर होय.गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे बॉलिवूडचा अनेक मोठ्या पार्ट्या बंद झाल्या होत्या. परंतु आता पुन्हा सर्वकाही सुरळीत झाल्याने, कलाकार पार्ट्यांचं आयोजन करत आहेत. नुकतंच करण जोहरने आपला 50 वा वाढदिवस  (Karan Johars 50th Birthday Bash)  साजरा केला. यावेळी त्याने रॉयल पार्टीचं आयोजन केलं होतं. यामध्ये अनेक बड्या बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. मात्र यावेळी एका व्यक्तीने चांगलंच लक्ष वेधलं होतं. आणि ती व्यक्ती इतर कोणी नसून बॉलिवूड दबंग सलमान खानची भाची (Salman Khan Niece) आहे. काल सायंकाळी मुंबईतील यशराज स्टुडिओमध्ये करण जोहरने आपल्या 50 व्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं. काल दिवसभर सोशल मीडियावर करणच्या बर्थडे बॅशची चर्चा होती. पार्टीची थीम काय असणार? व्हेन्यू-मेन्यू काय असणार? आणि महत्वाचं म्हणजे कोणकोणते सेलिब्रेटी यामध्ये सहभागी होणार? अखेर काल सायंकाळी करणच्या पार्टीमध्ये मोठमोठ्या बॉलिवूड स्टार्सची रेलचेल दिसून आली. यामध्ये काही स्टारकिड्ससुद्धा होते. शनाया, आर्यन, अनन्या,सारा,इब्राहिम,जान्हवी असे ओळखीचे चेहरे तर होतेच. पण एक असा चेहरासुद्धा होता जो नव्याने सर्वांच्या समोर आला. आणि तो चेहरा म्हणजे बॉलिवूड भाईजान सलमान खानची भाची अलिजेह अग्निहोत्री (Alizeh Agnihotri) होय.
  सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये सलमान खानची भाची आणि अलवीरा अग्निहोत्रीची लेक अलिजेह दिसून येत आहे. अलिजेह फिटनेस आणि सौंदर्यांच्या बाबतीत अभिनेत्रीना बरोबरीची टक्कर देते. या पार्टीमध्ये अलिजेहने कॉपी कलरचा शिमरी हायस्लिट गाऊन परिधान केला होता. यामध्ये ती फारच ग्लॅमरस दिसत होती. पार्टीमध्ये एन्ट्री करताना तिने पापाराझींना पोजसुद्धा दिल्या. सध्या हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे. (हे वाचा:करण जोहरच्या रॉयल बर्थडे पार्टीचे PHOTO आले समोर, पाहा कोणकोणत्या स्टार्सनी लावली हजेरी ) अलिजेह ही सलमान खानची बहीण अलवीरा अग्नीहोत्री (Alvira Agnihotri) हिची मुलगी आहे. अलविराचा पती अतुल अग्नहोत्री हा प्रसिद्ध चित्रपट निर्माता-अभिनेता आहे. अलिजेह सध्या काही जाहीराती आणि मॉडेलिंग असाइनमेंट्समध्ये दिसत आहे. त्यामुळे तिच्या बॉलिवूड पदार्पणाविषयी चर्चा रंगल्या आहेत.ती लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री करु शकते असा अंदाज वर्तविला जात होता. आता करण जोहरच्या पार्टीत अलिजेहला पाहून पुन्हा एकदा तिच्या पदार्पणाच्या चर्चा रंगल्या आहेत.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Bollywood News, Entertainment, Karan Johar, Salman khan

  पुढील बातम्या