सलमान खानची ही हिरॉइन होती प्रभासची क्रश, आता साकारणार तिच्याच मुलाची भूमिका

सलमान खानची ही हिरॉइन होती प्रभासची क्रश, आता साकारणार तिच्याच मुलाची भूमिका

'मैने प्यार किया'मधून (Maine Pyar Kia) पदार्पण केलेली ही अभिनेत्री केवळ प्रभासच नाही आजही अनेकांची क्रश आहे. अभिनेत्रीने स्वत: याबाबत खुलासा केला आहे.

  • Share this:

मुंबई, 04 ऑक्टोबर: दाक्षिणात्य सिनेमाच नव्हे तर इतर राज्यांतील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारा सुपरस्टार प्रभास (Prabhas) सध्या त्याचा अपकमिंग सिनेमा 'राधे श्याम' (Radhe Shyam) यामुळे चर्चेत आहे. यामध्ये पूजा हेगडे (Pooja Hegde) प्रभासबरोबर मुख्य भूमिकेत आहे. आता या सिनेमातील आणखी एका अभिनेत्रीबाबत माहिती समोर येत आहे, जी याआधी प्रभासची क्रश होती. ही अभिनेत्री आहे, सलमान खानच्या (Salman Khan) 'मैंने प्यार किया' (Maine Pyar Kia) मध्ये प्रमुख भूमिका साकारणारी भाग्यश्री (Bhagyashree). राधे श्याममध्ये भाग्यश्री प्रभासच्या आईची भूमिका साकारणार आहे.

दरम्यान, सुरुवातीला भाग्यश्री 'राधे श्याम'मध्ये ही भूमिका साकारण्यासाठी कचरत होती. अभिनेत्रीसाठी यामध्ये हिरोच्या आईची भूमिका साकारणं काहीसं अवघड होतं. सिनेमाचे दिग्दर्शक राधा कृष्ण कुमार यांनी भाग्यश्रीशी बातचीत केली आणि तिला विश्वास दिला की, चित्रपटात तिची भूमिका अशापद्धतीने असेल की प्रेक्षक तिला पसंत करतील.

अभिनेत्रीने प्रभासबरोबर पहिल्यांदा काम करण्याचा अनुभव देखील शेअर केला. तिने असे म्हटले की प्रभासच्या म्हणण्यानुसार तो 'मैंने प्यार किया'चा मोठा प्रशंसक आहे. एबीएन आंध्र ज्योतिशी बोलताना भाग्यश्री असं म्हणाली की, 'जेव्हा मी प्रभास यांना भेटले तेव्हा त्यांनी 'मैंने प्यार किया'बाबत सांगितले आणि असे म्हटले की ते याबाबत खूप खूश आहेत आणि 'राधे श्याम'मध्ये त्यांना त्यांच्या क्रशबरोबर काम करण्याची संधी मिळत आहे.'

Published by: Janhavi Bhatkar
First published: November 4, 2020, 8:32 AM IST

ताज्या बातम्या