मला ऑफिसला बोलावलं आणि...,मोठा फिल्ममेकवर 'या' अभिनेत्रीने केले Metoo चे आरोप

मला ऑफिसला बोलावलं आणि...,मोठा फिल्ममेकवर 'या' अभिनेत्रीने केले Metoo चे आरोप

आपल्या जागेवरून उठले आणि माझ्या बाजूला येऊन बसले. त्यानंतर त्यांनी माझ्या डोक्यावर, पाठीवर हात फिरवण्यास सुरुवात केली. ऑफिसमध्ये आम्ही दोघेच होतो

  • Share this:

नवी दिल्ली, 12 जानेवारी : बॉलिवूडमध्ये #Metoo मोहिमेमुळे एकच खळबळ उडाली होती. आता ही मोहिम बंगाली सिनेसृष्टीतही पोहोचली आहे. बंगाली सिनेमातील लोकप्रिय अभिनेत्री रूपंजना मित्रा (Rupanjana Mitra) ने कथित आणि मोठ्या बंगाली सिनेमाचे दिग्दर्शक अरिंदम सील (Arindam Sil) यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप केले आहे.

आनंदबाजार डिजिटलला दिलेल्या मुलाखतीत रूपंजना मित्राने खुलासा केला आहे की,  लोकप्रिय मालिका 'भूमिकन्या' च्या स्क्रिप्ट वाचण्यासाठी कोलकाता येथील ऑफिसमध्ये बोलावून अरिंदम सील यांनी गैरवर्तन केले.

या अभिनेत्रीने एबीपी डिजिटलला सांगितलं की, अरिंदम सील यांनी आपल्या ऑफिसमध्ये 'भूमिकन्या' च्या पहिल्या भागाची स्क्रिप्ट वाचण्यासाठी बोलावलं होतं. ही घटना दुर्गा पूजा होण्याच्या काही दिवसांआधी घडली. जेव्हा संध्याकाळी त्यांच्या ऑफिसमध्ये पोहोचली. तेव्हा संध्याकाळचे 5 वाजले होते पण तिथे कुणीही नव्हतं. मला खूप भीती वाटली होती. पण अचानक अरिंदम आपल्या जागेवरून उठले आणि माझ्या बाजूला येऊन बसले. त्यानंतर त्यांनी माझ्या डोक्यावर, पाठीवर हात फिरवण्यास सुरुवात केली. ऑफिसमध्ये आम्ही दोघेच होतो. मला भीती वाटत होती ही मी वाचणार नाही. मी देवाला प्रार्थना करत होती की, कुणी तिथे येईल.'

तिने पुढे सांगितलं की, काही वेळानंतर मला हे असह्य झालं. मी त्यांच्याशी स्क्रिप्टवर बोलण्याचं सांगितलं. त्यांना याची जाणीव झाली असावी की मला हे आवडलेलं नाही. त्यानंतर ते तिथून बाजूला झाले आणि स्क्रिप्टबद्दल सांगण्यास सुरूवात केली. त्यानंतर 5 मिनिटांनी त्यांची पत्नी तिथे आली.' या प्रकारमुळे रूपंजना यांना मानसिक धक्का बसला होता.

तर अरिंदम सील यांनी रूपंजनाने केलेल्या आरोपांचं खंडन केलं आहे. हा काही राजकीय स्टंट असू शकतो. मला माहिती नाही की रूपंजना हे कशासाठी करत आहे. आम्ही जुने मित्र आहोत. ती ज्या दिवशीची गोष्ट करत आहे. त्या भेटीनंतर तिथून गेल्यानंतर तिने मला एसमएमस करून 'काम करण्यासाठी आपण उत्साहित आहे' असं सांगितलं होतं. अजूनही तो मॅसेज माझ्याकडे आहे आणि मी तो कुणालाही दाखवू शकतो. जर तिच्यासोबत कुणी गैरव्यवहार केला असेल तर त्या माणसाला रुपंजनाने मॅसेज का केला? असा सवालही त्यांनी उपस्थितीत केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Bollywood
First Published: Jan 12, 2020 09:15 PM IST

ताज्या बातम्या