मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'मोठ्या त्रासातून अधिक ताकद मिळते', सुशांतच्या Death Anniversary आधीच रियाची भावनिक पोस्ट

'मोठ्या त्रासातून अधिक ताकद मिळते', सुशांतच्या Death Anniversary आधीच रियाची भावनिक पोस्ट

बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput)  निधनाने सर्वांनाचं मोठा धक्का बसला होता. 14 जूनला सुशांतच्या निधनाला एक वर्ष पूर्ण (Death Anniversary) होत आहे.

बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) निधनाने सर्वांनाचं मोठा धक्का बसला होता. 14 जूनला सुशांतच्या निधनाला एक वर्ष पूर्ण (Death Anniversary) होत आहे.

बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) निधनाने सर्वांनाचं मोठा धक्का बसला होता. 14 जूनला सुशांतच्या निधनाला एक वर्ष पूर्ण (Death Anniversary) होत आहे.

मुंबई, 28 मे- बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput)  निधनाने सर्वांनाचं मोठा धक्का बसला होता. 14 जूनला सुशांतच्या निधनाला एक वर्ष पूर्ण (Death Anniversary) होत आहे. मात्र हे वर्ष त्याच्या कुटुंबांसाठी आणि चाहत्यांसाठी सुद्धा खुपच कठीण होतं. इतकच नव्हे तर या प्रकरणामध्ये तुरुंगात जाऊन आलेली त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीसाठीही (Rhea Chakraborty)  हे वर्ष कधीही न विसरता येणारं ठरलं आहे.

सुशांत सिंह राजपूतचं आत्महत्या प्रकरण आणि ड्रग केसमध्ये नाव आल्यानंतर रियाने सोशल मीडियावर सक्रीय राहणं बंद केलं होतं. मात्र, आता पुन्हा एकदा ती सोशल मीडियावर काही दिवसांच्या अंतरानं एखादी पोस्ट करताना दिसून येत आहे. आता नुकतंच रियाने सुशांतच्या पहिल्या स्मृतिदिनाच्या काही दिवस आधीच एक पोस्ट शेअर केली आहे.

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर रियाने घडलेल्या सर्व गोष्टी मागे सोडत पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. हळूहळू ती सर्वसामान्य आयुष्यात परतत असताना दिसत आहे. 14 जूनला अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा पहिला स्मृतिदिन आहे. त्याआधी रियाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

(हे वाचा: VIDEO 'स्वीटू-ओमचा' एयरपोर्टवर रोमान्स, स्वीटूने दिली प्रेमाची कबुली  )

रियाने पोस्ट करत लिहिलं आहे, ‘मोठ्या त्रासातून मोठी ताकद मिळते. आपल्याला फक्त विश्वास ठेवायला हवा आणि तिथं थांबायला हवं, लव्ह रिया’ अशा आशयाची पोस्ट रियाने लिहिली आहे. रिया चक्रवर्तीच्या या पोस्टनंतर तिच्या चाहत्यांसोबत अनेक कलाकारांनीसुद्धा कमेंट्स केल्या आहेत. तिची मैत्रीण आणि अभिनेत्री अनुषा दांडेकरने कमेंट करत ‘माय गर्ल’ असं म्हटलं आहे. तर एका युजरने म्हटलं आहे, ‘देवाचा आशीर्वाद असो, काहीही कारण नसताना तुम्ही खूप काही सहन केलं आहे’.

(हे वाचा:बाई तुमचं डोकं ठिकाणावर आहे का?’ किमच्या फोटोंमुळं दुखावल्या हिंदुंच्या भावना  )

तर दुसरीकडे सुशांत सिंह राजपूतच्या चाहत्यांनीही रियाच्या पोस्टवर कमेंट करत म्हटलं आहे, ‘पाप आणि पुण्याचा सगळा हिशोब इथेच होतो’ आणि तिच्यासोबत सुद्धा असचं होईल’. रिया आपल्या या पोस्टमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

First published:

Tags: Rhea chakraborty, Sushant sing rajput