मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

कार्तिक आर्यनच्या 'Dhamaka' ला मोठा फटका; रिलीज होताच चित्रपट झाला LEAK

कार्तिक आर्यनच्या 'Dhamaka' ला मोठा फटका; रिलीज होताच चित्रपट झाला LEAK

कार्तिकचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'धमाका'  (Dhamaka)  OTT प्लॅटफॉर्म Netflix वर रिलीज झाला आहे. एकीकडे चित्रपटाचे सर्वत्र कौतुक होत असतानाच दुसरीकडे चित्रपटाबाबत एक वाईट बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'धमाका' चित्रपटही ऑनलाइन लीकपासून वाचलेला नाही. रिलीज होताच हा चित्रपट ऑनलाइन लीक  (Leak)  झाला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 20 नोव्हेंबर- हार्डबॉल पत्रकार अर्जुन पाठकच्या भूमिकेत कार्तिक आर्यन   (Kartik Aryan)  डिजिटल स्पेसवर सध्या धम्माल करत आहे. कार्तिकचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'धमाका'  (Dhamaka)  OTT प्लॅटफॉर्म Netflix वर रिलीज झाला आहे. एकीकडे चित्रपटाचे सर्वत्र कौतुक होत असतानाच दुसरीकडे चित्रपटाबाबत एक वाईट बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'धमाका' चित्रपटही ऑनलाइन लीकपासून वाचलेला नाही. रिलीज होताच हा चित्रपट ऑनलाइन लीक  (Leak)  झाला आहे.

" isDesktop="true" id="632733" >

रिपोर्टनुसार, 'धमाका' चित्रपट अनेक वेबसाइटवर लीक झाला आहे. ज्या वेबसाइट्सवर हा चित्रपट लीक झाला त्यात तमिळ रॉकर्सचे नाव देखील समाविष्ट आहे. या प्रकरणांमध्ये ही साइट सर्वात वर आहे असं म्हटलं जातं. याशिवाय, चित्रपट टेलिग्राम आणि इतर अनेक वेबसाइटवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. हा चित्रपट सर्व साइटवर एचडी प्रिंटमध्ये लीक झाला आहे.

राम माधवानी दिग्दर्शित 'धमाका'मध्ये कार्तिकच्या परिवर्तनाने चाहत्यांना थक्क केले आहे. विशेष म्हणजे, कार्तिक आर्यन गेल्या काही काळापासून रोमँटिक-कॉमेडी क्षेत्रावर राज्य करत असताना. 'धमाका' हा त्याच्या कारकिर्दीतील टर्निंग पॉइंट आहे. ज्याने त्याच्या करिअरच्या आलेखात एक नवीन पान जोडलं आहे.

सोशल मीडियावर लोक कार्तिकच्या अभिनयाचे सतत कौतुक करत आहेत. 'धमाका' मध्ये, कार्तिकने हार्डबॉल पत्रकार अर्जुन पाठकची भूमिका केली आहे. जो एक वेडसर (सनकी) माजी वृत्त अँकर आहे, ज्याला त्याच्या रेडिओ कार्यक्रमात एक भयानक कॉल येतो आणि त्याला करिअरमध्ये पुनरागमन करण्याची संधी दिसते. तथापि, त्याला त्याच्या विवेकबुद्धीची किंमत मोजावी लागेल.

(हे वाचा:अभिनेत्री एवलिन शर्मानं लेकीला दिला जन्म; सुंदर PHOTO शेअर करत सांगितलं 'नाव')

राम माधवानी आपल्या अभिनेत्यांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनय आणण्यासाठी ओळखला जातो. आणि 'धमाका' चित्रपट पाहता हा कार्तिक आर्यनचा आजपर्यंतचा सर्वोत्तम अभिनय आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. या चित्रपटातून रोमँटिक हिरो कार्तिकने स्वतःची एक नवीन प्रतिमा प्रेक्षकांसमोर मांडली आहे. पहिल्याच दिवशी चित्रपट समीक्षकांकडून मिळालेला प्रतिसाद आणि कौतुक यामुळे अभिनेता खूप खूश आहे. राम माधवानी दिग्दर्शित या चित्रपटात कार्तिकचा दमदार अभिनय पाहायला मिळत आहे.कार्तिकसोबतच चित्रपटात मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूरनेही उत्कृष्ट अभिनय केला आहे. तिच्याही अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत आहे.

First published:

Tags: Bollywood actor, Entertainment, Kartik aryan