मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /अथिया शेट्टीने बॉयफ्रेंड KL Rahul वर केला प्रेमाचा वर्षाव; शस्त्रक्रियेनंतर शेअर केला फोटो

अथिया शेट्टीने बॉयफ्रेंड KL Rahul वर केला प्रेमाचा वर्षाव; शस्त्रक्रियेनंतर शेअर केला फोटो

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री आणि प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टीची लेक (Sunil Shetty Daughter) अथिया शेट्टी (Athiya Shetty) आपल्या चित्रपटांपेक्षा जास्त आपल्या लव्हलाईफमुळे चर्चेत असते. सध्या ती भारतीय क्रिकेटर केएल राहुलसोबत (KL Rahul)  रिलेशनशिपमध्ये आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 30 जून-   बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री आणि प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टीची लेक (Sunil Shetty Daughter) अथिया शेट्टी (Athiya Shetty) आपल्या चित्रपटांपेक्षा जास्त आपल्या लव्हलाईफमुळे चर्चेत असते. सध्या ती भारतीय क्रिकेटर केएल राहुलसोबत (KL Rahul)  रिलेशनशिपमध्ये आहे. नुकतंच केएलवर एक शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या शस्त्रक्रियेनंतर अथियाने केएल राहुलवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिका सुरू होण्याच्या एक दिवस आधी राहुलला दुखापत झाली होती. दुखापतीनंतर तो शस्त्रक्रियेसाठी जर्मनीला गेला होता. जिथे आता त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. केएल राहुलच्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर आता अथिया आनंदी आहे.

अथियाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. जो काही तासांपूर्वी केएल राहुलने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. अथियाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर केएल राहुलच्या फोटोसोबत स्माईली इमोजी शेअर केला आहे. राहुलच्या शस्त्रक्रियेनंतरचा हा फोटो आहे. फोटोमध्ये केएल राहुल बेडवर बसलेला दिसून येत आहे, सोबतच त्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य दिसत आहे.

केएल राहुलची ही शस्त्रक्रिया जर्मनीमध्ये झाली आहे. तिथे अथिया शेट्टी देखील त्याच्यासोबत त्याची काळजी घेण्यासाठी गेलेली दिसत आहे. जर्मनीला रवाना होण्यापूर्वी मुंबई एयरपोर्टवरील दोघांचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राहुल तब्बल एक महिना जर्मनीत राहणार आहे.

(हे वाचा:VIDEO: 'मी लग्नाआधीच GOOD NEWS...', बोलता-बोलता हे काय बोलून गेली राखी सावंत? )

केएल राहुल पोस्ट-

तत्पूर्वी, केएल राहुलने त्याच्या यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल अपडेट देत सोशल मीडियावर लिहलं होतं, सर्वप्रथम त्याने त्याचे चाहते आणि कुटुंबियांचे आभार मानले होते. सोबतच लिहलं होतं, “गेले काही आठवडे माझ्यासाठी खूप कठीण होते पण माझी शस्त्रक्रिया यशस्वी झाली. मी हळूहळू बरा होत आहे. मी ठीक होण्यासाठी फास्ट रिकव्हरीही सुरू केली आहे. आपल्या काळजी आणि प्रेमासाठी धन्यवाद. लवकरच भेटू.."

First published:
top videos

    Tags: Bollywood actress, Entertainment, Kl rahul