Home /News /entertainment /

अर्जुन कपूरने शेअर केला मलायकासोबतचा स्विमिंगपूलमधील VIDEO; कॅप्शनने वेधलं लक्ष

अर्जुन कपूरने शेअर केला मलायकासोबतचा स्विमिंगपूलमधील VIDEO; कॅप्शनने वेधलं लक्ष

अर्जुन आणि मलायका मालदीवमध्ये एकत्र व्हॅकेशन एन्जॉय करत आहेत. मलायका-अर्जुन, दोघेही मालदीवमधील त्यांचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ आपापल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर करत आहेत.

  मुंबई,5 डिसेंबर-   मलायका अरोरा    (Malaika Arora)  आणि अर्जुन कपूर   (Arjun Kapoor)  यांचे नाते दिवसेंदिवस घट्ट होत आहे. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे बॉलिवूडमधील सर्वात चर्चित कपल आहे. या दोघांच्या नात्याची चर्चा मीडिया आणि चाहत्यांमध्ये रंगत असते. त्यांच्या नात्याचा अधिकृत खुलासा केल्यानंतर दोघेही मोठ्या बिनधास्तपणे लोकांसमोर येतात. दोघे अनेकदा आउटिंग आणि डिनर डेटला एकत्र जातात. पुन्हा एकदा अर्जुन आणि मलायका मालदीवमध्ये एकत्र व्हॅकेशन एन्जॉय करत आहेत. मलायका-अर्जुन, दोघेही मालदीवमधील त्यांचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ आपापल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर करत आहेत. दरम्यान, काही वेळापूर्वी अर्जुनने मलायकासोबतचा एक व्हिडिओ त्याच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये अर्जुन आणि मलायका दोघेही स्विमिंग पूलमध्ये एकत्र सायकल चालवताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना अर्जुनने लिहिलेले कॅप्शन अधिक चर्चेत आले आहे. व्हिडिओ शेअर करताना अर्जुनने लिहिले, 'जेव्हा गर्लफ्रेंड तुमच्या ट्रेनरपेक्षा कठीण टास्कमास्टर असते!!!'. तसेच माजी जागतिक किकबॉक्सिंग चॅम्पियन ड्रू नीलला टॅग करत त्याने लिहिले, 'हे बघ ड्र्यू नील, मी सुट्टीतही मालदीवमध्ये वर्कआउट करत आहे, धन्यवाद मलायका अरोरा.'
  View this post on Instagram

  A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

  मलायका अरोरा आपल्या फिटनेस आणि सौंदर्याने नवीन अभिनेत्रीला मागे टाकताना दिसत आहे. मलायकाच्या फोटोंमध्ये तिचा परफॉर्मन्स पाहून चाहत्यांची उत्सुकता वाढते. मलायका अरोरा तिच्या फॅशन सेन्स, फिटनेस आणि लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. मलायका अरोराही पापाराझींची आवडती आहे. जिमपासून योगा सेशनपर्यंत किंवा लंच-डिनरपर्यंत पापाराझी त्याला फॉलो करतात. अशा परिस्थितीत, अनेक वेळा यूजर्स मलायकाच्या फिटनेस आणि फिगरची जोरदार प्रशंसा करतात, तर अनेक वेळा तिला ट्रोल केले जाते.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Arjun kapoor, Entertainment, Malaika arora

  पुढील बातम्या