VIDEO : सलमान खान चित्रपटात का करत नाही KISS, अरबाजने सांगितलं रहस्य

VIDEO : सलमान खान चित्रपटात का करत नाही KISS, अरबाजने सांगितलं रहस्य

सलमान वैयक्तिक जीवनात स्वत:ची प्रतिष्ठा जशी जपण्याचा प्रयत्न करतो तशीच तो चित्रपटातही करत असतो. हे आपल्याला माहीत असेलच. पण चित्रपटांमध्ये सलमान किसिंग सीन का करत नाही याबद्दल आता अरबाज खानने उलगडा केला आहे.

  • Share this:

मुंबई 05 जानेवारी : सलमान खान वैयक्तिक जीवनात त्याची प्रतिष्ठा जशी जपतो, तशीच तो चित्रपटातही जपण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्या सिनेमातून लोकांपर्यंत एखादा संदेश पोहचावा असा प्रयत्न सलमान करत असतो. चित्रपटांमध्ये किसिंग सीन सलमान का करत नाही याबद्दल त्याचा भाऊ अरबाज खानने आता उलगडा केला आहे.

टेलिव्हिजनचा प्रसिद्ध विनोदी कलाकार कपिल शर्माच्या कार्यक्रमात लवकरच बॉलिवूडचे खान बंधू म्हणजेच सलमान खानचं कुटुंब येणार आहे. या कार्यक्रमात सलमानचे भाऊ सोहेल, अरबाज आणि यांचे वडील सलीम खानसुद्धा दिसणार आहेत. याआधी अशा कार्यक्रमातून खान बंधूंने एकमेकांबद्दल असे अनेक किस्से सांगितले आहेत. यावेळी सोनी एंटरटेनमेंटने सोशल मीडियावर द कपिल शर्मा शोचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये अरबाज खान सलमानच्या चित्रपटातील किसिंग सीनबद्दलचं  रहस्य सांगत आहे.

कार्यक्रमात सलमान आणि कपिल गप्पा मारत असताना अभिनेत्रींसोबत सलमान पडद्यावर किस करत नसल्याचा उल्लेख त्यानं केला. यावर गमतीशीर उत्तर म्हणून अरबाज मौन सोडत म्हणाला की, पडद्यामागे सलमानच  किस करत असतो त्यामुळे पडद्यावर करायची गरज भासत नाही. यावर कार्यक्रमातील सगळ्यांना हसू आवरत नाही आणि सलमान खान देखील हसत हसत लाजायला लागला.

अरबाज खानने एका कार्यक्रमात सांगितलं होतं की 2018 या वर्षात 'दबंग-3' येईल पण सलमान खान सध्या भारत चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटानंतर 'दबंग-3' सिनेमाचं काम सुरू होईल अशी आशा आहे. या वर्षी चुलबुल पांडे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

First published: January 5, 2019, 12:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading