संगीतकार ए. आर. रेहमानसह दिग्गज गायक सुशांतला देणार म्युझिकल ट्रिब्युट

संगीतकार ए. आर. रेहमानसह दिग्गज गायक सुशांतला देणार म्युझिकल ट्रिब्युट

सुशांतच्या (sushant singh rajput) आठवणीत 22 जुलैला हे म्युझिकल ट्रिब्युट दिलं जाणार आहे.

  • Share this:

मुंबई, 20 जुलै : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) आत्महत्येला आता एक महिना पूर्ण झाला आहे. अजूनही सुशांत प्रत्येकाच्या आठवणीत आहे. सुशांतचं कुटुंबच नव्हे तर त्याचे मित्रमैत्री, चाहते आणि बॉलीवूड सेलिब्रिटींनाही त्याची आठवण येते आहे. आता सुशांतच्या आठवणीत संगीतकार ए. आर. रेहमान यांच्यासह दिग्गज गायक सुशांतला म्युझिकल ट्रिब्युट देणार आहेत.

सुशांत सिंह राजपूतला म्युझिकल ट्रिब्युट देण्यासाठी डिज्नी हॉटस्टार आणि सोनी म्युझिक इंडियाने एक कार्यक्रमा आयोजित केलं आहे. 12 जुलैला दुपारी 12 वाजता सुशांतला म्युझिकल ट्रिब्युट दिलं जाणार आहे.

ऑस्कर विजेते संगीतकार ए. आर. रेहमान यांच्याशिवाय गायिका श्रेया घोषाल, अरिजीत सिंह, मोहित चौहान, सुनिधी चौहान, शाशा तिरुपती, जोनिटा आणि हृदय गट्टानी यांचा या कार्यक्रमात समावेश असणार आहे.

हे वाचा - चार डॉक्टरांकडून उपचार घेत होता सुशांत; पोलीस तपासात धक्कादायक माहिती

सुशांतचा शेवटचा चित्रपट मुकेश छाबरा दिग्दर्शित दिल बेचाराची सर्व गाणी ए. आर. रेहमान यांनी कंपोझ केली आहेत. तारे गिन हे गाणं श्रेया घोषाल आणि मोहित चौहानने गायलं आहे. मसखरी गाणं सुनिधी चौहान, हृदय गट्टानी यांनी गायलं आहे.

याआधी गायिका नेहा कक्करने सुशांतला म्युझिकल ट्रिब्युट दिलं होतं. नेहाने सुशांतची फिल्म केदारनाथमधील जान निसार गाणं गात त्याल श्रद्धांजली दिली होती. नेहाने हा व्हिडीओ आपल्या युट्युब चॅनेलवर शेअर केला होता.

हे वाचा - "...मग इंडस्ट्री सोड", कंगनाच्या आरोपांनी त्रस्त झालेल्या करण जोहरचा VIDEO VIRAL

14 जून रोजी सुशांतने मुंबईतल्या वांद्रेत आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.

Published by: Priya Lad
First published: July 20, 2020, 9:06 PM IST

ताज्या बातम्या