अपूर्व असरानीनं केला कंगनावर हल्ला

अपूर्व असरानीनं केला कंगनावर हल्ला

आता अपूर्व असरानीने पुन्हा एकदा कंगनाला लक्ष्य केले आहे. अपूर्वनं एका ट्विटमधून कंगनावर हल्ला चढवला आहे.

  • Share this:

मुंबई, 3 सप्टेंबर : कंगना राणावत आणि वाद हे कायमचं बरोबर असतात. कंगना रुठलाही वाद ओढून घेत नाही असं कधी होत नाही. पटकथा लेखक अपूर्व असरानी आणि अभिनेत्री कंगना राणावतचा वाद तसा जुनाच. 'सिमरन' या चित्रपटाच्या कथालेखनाचे श्रेय घेण्यावरून अपूर्व असरानी आणि कंगना राणावत यांचं बिनसलं होतं. आता अपूर्व असरानीने पुन्हा एकदा कंगनाला लक्ष्य केले आहे. अपूर्वनं एका ट्विटमधून कंगनावर हल्ला चढवला आहे.चित्रपटात कॅमेऱ्याच्या मागेही लुडबूड करणे, लोकांवर वरचढ होणं आणि आपलंच ते खरं करण्याचा स्वभाव कंगनासाठी आत्मघात आहे. स्वत:लाच गर्तेत ढकलण्याचं काम कंगना करतेय, असं त्यानं म्हटलं आहे.

कॅन्सरवर मात करत इरफान खान करणार 'या' बायोपिकमध्ये काम

'बिग बाॅस 12'मध्ये झळकणार एक मराठी अभिनेत्री

इम्तियाज अली घेऊन येतोय राधाकृष्णाची निराळी 'LOVE STORY'

अपूर्व असरानीनं अलिगढची पटकथा लिहिली होती. तो म्हणतो, कुठल्याही सिनेमावर स्वत:चा कब्जा करणं हे भयंकर आहे. आणि त्याविरोधात कोणी काही बोलत नाही.

एका मुलाखतीत सोनूने मणिकर्णिका चित्रपट सोडल्याचं कारण सांगितलं. यावेळी तो म्हणाला की, मणिकर्णिकाचे काही सीन्स परत रिशूट करण्याचा निर्णय चित्रपटाच्या दिग्दर्शक क्रिशने घेतला आहे. पण हा चित्रपट घेण्याआधीच मी रोहित शेट्टीचा ‘सिंबा’ चित्रपट स्वीकारला होता आणि त्यानुसार दोन्ही चित्रपटांना डेट्स दिल्या होत्या. आता या चित्रपटाच्या रिशूटसाठी माझ्याकडे वेळ नाही.

सोनूच्या या निर्णयावर कंगनाने त्याच्यावर आरोप करत असं म्हटलं आहे की,सोनूने त्याच्या पात्रात त्याला हवे तसे बदल घडवून आणले होते,  ज्याची चित्रपटात फारशी गरज नव्हती. त्यामुळे आता त्याचे आधी शूट झालेल्या सीन्सचा काहीच उपयोग नसल्याने आम्ही नवीन पात्रासह हे सगळे सीन्स शूट करणार आहोत. शिवाय असं म्हणतात की मणिकर्णिका सिनेमात कंगनाची ढवळाढवळ चालते. तेच सोनू सूदला पसंत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 3, 2018 09:04 AM IST

ताज्या बातम्या