VIDEO : कचरा टाकणाऱ्याला अनुष्काने शिकवला धडा, विराटने शेअर केला व्हिडिओ

VIDEO : कचरा टाकणाऱ्याला अनुष्काने शिकवला धडा, विराटने शेअर केला व्हिडिओ

  • Share this:

मुंबई, 16 जून : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाशी जोडली गेली आहे. कारमधून रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या तरुणाला अनुष्काने फटकारून काढलंय. हा तरुण कारमधून रस्त्यावर कचरा फेकत होता, त्याला पाहताच कार थांबवून "तुम्ही रस्त्यावर कचरा का फेकताय, यापुढे लक्षात ठेवा रस्त्यावर असा कचरा फेकू नका" असं अनुष्काने सुनावलंय.

विराट कोहली आणि  अनुष्का शर्मा नेहमी सोशल मीडियावर आपले  वैयक्तिक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात; परंतु एक नवीन व्हिडिओ असा शेअर केला आहे की ज्यात त्यांची जागरूकता दिसून येत आहे. विराटने ट्विटरवर अनुष्काचा एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात अनुष्का एका व्यक्तीला रागवत आहे.

हा व्हिडिओ शेअर करताना विराट लिहीतो, “या लोकांना रस्त्यावर कचरा टाकताना पाहून त्यांना याबद्दल शिस्तीने समजवलं. महागड्या कारमध्ये फिरतात तरी डोक्याचा वापर करत नाही.”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 16, 2018 10:00 PM IST

ताज्या बातम्या