काही दिवसांपूर्वी गायलं होतं शंकर महादेवन यांनी आदित्य पौडवालचं गाणं, मृत्यूनंतर संगीतसृष्टी शोकाकुल

काही दिवसांपूर्वी गायलं होतं शंकर महादेवन यांनी आदित्य पौडवालचं गाणं, मृत्यूनंतर संगीतसृष्टी शोकाकुल

अनुराधा पौडवाल (Anuradha Paudwal) यांचा मुलगा आदित्य पौडवाल (Aditya Paudwal) याच्या बद्दल खूप कमी लोकांना माहित आहे. मात्र तो एक उत्तम संगीत दिग्दर्शक होता. प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी देखील त्याची गाणी गायली आहेत

  • Share this:

मुंबई, 13 सप्टेंबर : प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल (Anuradha Paudwal) यांचा मुलगा आदित्य पौडवाल (Aditya Paudwal) एक संगीतकार होता. त्याच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण संगीतसृष्टी शोकाकुल आहे. गायक शंकर महादेवन (Shankar Mahadevan) यांनी त्याच्याबाबत भावुक पोस्ट शेअर केली आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्याबरोबर महादेवन यांनी गाणं गायल्याचीही माहिती मिळते आहे.

आदित्य पौडवालचे (Aditya Paudwal) शनिवारी पहाटे निधन झाले. दीर्घकाळापासून तो मूत्रपिंडाच्या आजाराशी सामना करत होता. मूत्रपिंड निकामी झाल्याने शनिवारी पहाटे आदित्यची प्राणज्योत मालवली. अवघ्या 35 व्या वर्षी आदित्य पौडवाल याचे निधन झाले आहे. आदित्यच्या अशा जाण्याने पौडवाल कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

आदित्याच्या मृत्यूचे कळताच शंकर महादेवन यांनी सोशल मीडियावर असे लिहिले होते की, 'ही बातमी ऐकून मी स्तब्ध झालो आहे. आपल्या सर्वांचा लाडका आदित्य आता आपल्यात नाही राहिला. विश्वास बसत नाही आहे. तो एक उत्तर संगीतकार आणि चांगला माणूस होता. मी त्याच्याबरोबर खूप प्रोजेक्टमध्ये काम केले आहे. खूप प्रेम... आठवणीत राहशील..'

आदित्यबद्दल संगीतसृष्टीतील अनेकांनी त्याच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत.

गायक अरमान मलिक याने देखील ट्विटरच्या माध्यमातून आदित्यला श्रद्धांजली वाहिली होती. त्याने असे लिहिले होते की, 'मी आता धक्क्यामध्ये आहे. एक खूप प्रतिभाशाली व्यक्ती आपणा सर्वांना सोडून गेली आहे. मला आठवतंय की पहिल्यांदा मी 2014 मध्ये त्यांच्या स्टुडिओमध्ये भेटलो होतो. या बातमीवर विश्वास बसत नाही आहे. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो.'

आदित्यने देखील त्याच्या आईप्रमाणे काही भजनं गायली आहेत. यावर्षाच्या सुरुवातीला देखील त्याने असे सांगितले होते की, तो भक्ति संगीतावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची योजना आखत आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: September 13, 2020, 3:37 PM IST

ताज्या बातम्या