"तुमच्यामुळेच हे शक्य झालं", आई कोरोनामुक्त झाल्यानंतर अनुपम खेर यांनी शेअर केला VIDEO

अनुपम खेर (anupam kher) यांची आई दुलारीला (dulari kher) लवकरच डिस्चार्ज देऊन होम क्वारंटाइन केलं जाणार आहे.

  • Share this:

मुंबई, 20 जुलै : बॉलीवूड अभिनेते अनुपम खेर (anupam kher) यांच्या आईने कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. दुलारी खेर (Dulari kher) आता कोरोनामुक्त झाल्या आहेत. अनुपम यांनी व्हिडीओ शेअर करून आपल्या चाहत्यांना ही बातमी दिली आहे. त्यांना आता घरी जाण्याची परवानगी दिली असून होम क्वारंटाइन केलं जाणार आहे.

गेल्या आठवड्यात अनुपम यांच्या घरातील चौघांना कोरोना झाल्याचं निदान झालं. त्यांची आई, भाऊ, वहिनी आणि पुतणीचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले. अनुपम खेर यांच्या आईमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं आढळून होती. जवळपास आठवडाभर त्यांच्यावर उपचार सुरू होते.

अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करून डॉक्टर्स, मुंबई महापालिका आणि चाहत्यांचे आभार मानलेत. तसंच ज्यांच्या घरात कोरोना रुग्ण आहेत, त्यांना एकटं पडल्यासारखं वाटतं. मात्र ते एकटे नाहीत आम्ही त्यांच्या सोबत आहोत असंही अनुपम म्हणालेत.

हे वाचा - बिग बींना कोरोना झाल्यानंतर बॉलीवूडच्या किंगने घेतला धसका; भीतीने काय केलं पाहा

अनुपम खेर यांच्या आईची प्रकृती खराब होत होती. त्यांना भूक लागत नव्हती, अशक्तही वाटत होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, त्यांची चाचणी करण्यात आली. त्यानंतर सीटी स्कॅन केले गेले त्यावेळी त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणं असल्याचे आढळून आले. यानंतर अनुपम आणि त्याचा भाऊ राजू यांचीही कोरोना टेस्ट झाली. या अनुपम यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असून, त्यांच्या भावाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर राजू खेर यांच्या कुटूंबाची कोरोना टेस्टही झाली. यात राजू यांची पत्नी आणि मुलगी यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले.

Published by: Priya Lad
First published: July 20, 2020, 10:44 PM IST

ताज्या बातम्या