'ती माझी खरी हीरो', सोनालीला भेटून भावूक झाले अनुपम खेर

News18 Lokmat | Updated On: Aug 13, 2018 11:52 AM IST

'ती माझी खरी हीरो', सोनालीला भेटून भावूक झाले अनुपम खेर

मुंबई, १३ ऑगस्ट- बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर हे काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री सोनाली बेंद्रेला भेटण्यासाठी खास न्यूयॉर्कला गेले होते. येथे मेटास्टॅटिक कर्करोगाशी लढणाऱ्या सोनालीला अनुपम यांनी हिरो म्हटले आहे. अनुपम यांनी ट्विट करत म्हटले की, ‘सोनालीसोबत मी काही सिनेमांमध्ये काम केले आहे. तसेच मुंबईमध्ये अनेक कार्यक्रमांमध्येही आम्ही भेटायचो. नेहमीच ती आपुलकीने प्रत्येक व्यक्तीला भेटते. पण गेल्या १५ दिवसांमध्ये तिच्यासोबत वेळ घालवण्याची संधी मला मिळाली आणि आज मी अभिमानाने सांगू शकतो की, ‘ती माझी हिरो आहे.’’

हे ट्विट करताना खेर यांनी सोनालीचा फोटो शेअर केला. कर्करोगावर उपचार घेण्यासाठी सोनालीने केस कापले होते तेव्हाचा फोटो खेर यांनी शेअर केला. सोनाली आणि अनुपम यांनी ढाई अक्षर प्रेम के, हमारा दिल आपके पास है आणि दिल गी दिल मैं या सिनेमांत काम केले आहे. अनुपम खेर यांच्या आगामी कामाबद्दल बोलायचे झाले तर, सध्या ते न्यू एम्सटर्डम या वेबसीरिजच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहेत. सोनाली गेल्या काही वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. इंडियाज बेस्ट ड्रामेबाज या रिअलिटी शोमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत होती. २०१३ पासून ती या शोशी निगडीत आहे. कर्करोगाचे निदान होण्यापूर्वीही ती याच शोची परीक्षक होती. उपचारांसाठी सोनाली न्यूयॉर्कला गेल्यानंतर तिच्या जागी हुमा कुरेशीची वर्णी लागली.

हेही वाचा-

सोनाली बेंद्रेचं मुलाला वाढदिवसानिमित्त इमोशनल पत्र

ही मीच आहे आणि मी फार खूश आहे, Friendship Day वर सोनाली बेंद्रेचा अनोखा संदेश

सोनाली बेंद्रेच्या प्रकृतीबद्दल तिच्या नवऱ्यानं दिली पहिली प्रतिक्रिया

...आणि म्हणून सोनाली बेंद्रेला झाला हाय ग्रेड कॅन्सर !

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 13, 2018 10:20 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close