मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

सुशांतच्या आत्महत्येनंतर नेपोटिझमचा वाद; दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांचा बॉलिवूडलाच रामराम

सुशांतच्या आत्महत्येनंतर नेपोटिझमचा वाद; दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांचा बॉलिवूडलाच रामराम

दिग्दर्शक अनुभव सिन्हा (anubhav sinha) यांनी आपण बॉलीवूड सोडत असल्याचं जाहीर केलं.

दिग्दर्शक अनुभव सिन्हा (anubhav sinha) यांनी आपण बॉलीवूड सोडत असल्याचं जाहीर केलं.

दिग्दर्शक अनुभव सिन्हा (anubhav sinha) यांनी आपण बॉलीवूड सोडत असल्याचं जाहीर केलं.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 21 जुलै : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (sushant singh rajput) आत्महत्येनंतर बॉलीवूड इंडस्ट्री वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. नेपोटिझम, मुव्ही माफिया, स्टार किड्स यांच्याबाबत चर्चा सुरू झाली. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या. ही चर्चा म्हणजे हास्यास्पद असल्याचं दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी म्हटलं होतं. आता या नेपोटिझमच्या वादानंतर त्यांनी बॉलीवूडलाच रामराम ठोकला आहे.

दिग्दर्शक अनुभव सिन्हा (Anubhav Sinha) यांनी आपण बॉलीवूड सोडत असल्याचं जाहीर केलं. त्यांनी याबाबत ट्वीट केलं आहे. "आता बस्स झालं. मी आता बॉलीवूडचा राजीनामा देतो", असं ट्वीट त्यांनी केलं आहे.

काही दिवसांपूर्वी बोलताना अनुभव सिन्हा  म्हणाले होते की, सुशांतच्या आत्महत्येनंतर सुरू असलेली ही चर्चा हास्यास्पद आहे. हे दररोजचं नाटक त्रास देणारं आहे आणि या वादात राजकीय मुद्देही जुडलेले असल्याची शंकाही त्यांनी व्यक्त केली होती. ज्याची सुरुवात सुशांतच्या निधनानंतर झाली आहे.

हे वाचा - "ओव्हर स्मार्ट बनू नका", सुशांतचा शेवटचा चित्रपट दिल बेचाराबाबत चेतन भगतचा इशारा

"आपलं आयुष्य संपवणं सोपं नाही आणि विशेषत: तेव्हा जेव्हा तुम्ही सर्वकाही चांगलं करत असता. आपल्याला शांत राहण्याची गरज आहे. मात्र अनेक चर्चा झाल्यात आणि यात राजकारणही घुसलं आहे, अशी शंका मला आहे आणि हे कोणासाठीही चांगलं नाही, त्या मुलासाठीदेखील नाही. मी त्या मुलाला शांतीत राहण्यास देऊ इच्छितो. तो खरंच त्रस्त, बैचेन आण अशांतीत राहिला असणार. आपल्याला काही वेळ त्याला आराम द्यायला हवा", असंही अनुभव सिन्हा म्हणाले होते.

हे वाचा - 'मी या नवीन कंगनाला ओळखत नाही',असं काय झालं की अनुराग कश्यपने कंगनाला फटकारलं?

सुशांत सिंह राजपूतने 14 जूनला मुंबईत वांद्र्यातील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तो डिप्रेशनमध्ये असल्याची माहिती समोर आली. त्याच्या आत्महत्येला बॉलीवूडमधील नेपोटिझमला जबाबदार धरलं जात आहे. दरम्यान याप्रकरणी आता पोलीस तपास सुरू आहे.

First published:

Tags: Bollywood, Sushant Singh Rajput