कोणाचा पहिला पगार 80 रुपये, कोणी दुकानात करायचं काम; बॉलिवूड फिल्ममेकर्सची स्ट्रगल स्टोरी

कोणाचा पहिला पगार 80 रुपये, कोणी दुकानात करायचं काम; बॉलिवूड फिल्ममेकर्सची स्ट्रगल स्टोरी

पडद्यामागून संपूर्ण चित्रपट तयार करणाऱ्या फिल्ममेकर्सविषयी फारसं लोकांना माहीत नसतं. या पडद्यामागच्या दिग्गजांनीही आयुष्यात अनेक खडतर वळणं पार करत आपली वाट तयार केलेली असते. सोशल मीडियावर हा विषय ट्रेंड होतोय त्यामुळेच फिल्ममेकर्सच्या पहिल्या पगाराची चर्चा होतेय.

  • Share this:

मुंबई, 19 नोव्हेंबर : बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये यश मिळवणाऱ्या प्रत्येक सेलिब्रिटीमागे एक शॉकिंग स्ट्रगल स्टोरी दडलेली असते. प्रत्येक स्टोरीमध्ये त्या स्टार्सचा संपूर्ण स्ट्रगल आपल्याला अगदी मार्मिक आणि प्रेरणादायी वाटतो. त्याच वेळी, आपण बर्‍याचदा पडद्यावर दिसणाऱ्या स्टार्सविषयी बोलतो पण पडद्यामागून संपूर्ण चित्रपट तयार करणाऱ्या फिल्ममेकर्सविषयी फारसं लोकांना माहीत नसतं. या पडद्यामागच्या दिग्गजांनीही आयुष्यात अनेक खडतर वळणं पार करत आपली वाट तयार केलेली असते. खरं तर सोशल मीडियावर हा विषय ट्रेंड होतोय त्यामुळे सगळे त्याबद्दल चर्चा करत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल ट्रेंडच्या माध्यमातून हंसल मेहता आणि अनुभव सिन्हांसारख्या बॉलिवूड फिल्ममेकर्सनी त्यांच्या पहिल्या नोकरीतून मिळालेल्या पहिल्या कमाईची कहाणी शेअर केली आहे.

सोशल मीडियावर तर दर दुसऱ्या दिवशी एखादा टॉपिक ट्रेंडिंग होताना दिसतो. हल्लीच ट्विटरवर व्हायरल झालेल्या ट्रेंडच्या माध्यमातून सुप्रसिद्ध बॉलिवूड फिल्ममेकर्सनी फिल्म्समध्ये येण्यापूर्वी त्यांच्या जीवनाची कहाणी सांगितली आहे.

सुप्रसिद्ध हिंदी चित्रपट दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी ट्विट करताना लिहिलंय, 'पहिला पगार- 80 रुपये, वय -18. इंजिनियरिंग कॉलेजमध्ये असताना स्मोकिंगचा खर्च भागवण्यासाठी सातवीच्या विद्यार्थ्याची अरिथमॅटिकची शिकवणी घेतली होती.'

त्याशिवाय हंसल मेहता यांनी ट्विट केलंय, 'पहिला पगार - 450 रुपये, वय -16. इन्टर्सशॉप केम्प्स कॉर्नरमध्ये सेल्सपर्सन म्हणून FU ची जीन्स आणि कॅज्युअल पोशाख विकल्याबद्दल. माझ्या ज्युनियर कॉलेजमधील वॉर्डरोबसाठी.' त्याचबरोबर, बरेच इतर फिल्ममेकर्स या ट्रेंडमध्ये सामील होत आहेत आणि त्यांची पहिली कमाई आणि कामाचा अनुभव शेअर करत आहेत.

उमेश के. शुक्ला यांनी लिहिलंय, पहिली कमाई 35 रुपये, दिग्दर्शक महेंद्र जोशी यांच्या हाताखाली बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून काम करायचो. लिओ टॉइज आणि निकिताशा किचनेटसाठी सेल्समन म्हणून काम केल्याबद्दल 400 रुपये कमावले होते.

अनुभव सिन्हा यांनी 'तुम बिन', 'दस', 'आपको पहले भी कहीं देखा है', 'मुल्क', 'आर्टिकल 15', 'थप्पड' यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. सामाजिक विषयांवर आधारित चित्रपट तयार करण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. हंसल मेहतांनी 'सिटी लाइट्स', 'सिमरन', 'अलिगढ', 'शहीद', 'राख' असे चित्रपट दिले आहेत. नुकतीच प्रदर्शित झालेली 'स्कॅम 1992' ही वेबसीरिजही प्रेक्षकामध्ये जबरदस्त गाजली आहे. शेअर बाजारात घोटाळा करणाऱ्या हर्षद मेहताच्या जीवनावर आधारित ही सीरिज आहे.

Published by: Karishma Bhurke
First published: November 19, 2020, 2:08 PM IST
Tags: Bollywood

ताज्या बातम्या