अभिनव बिंद्रांच्या बायोपिकमध्ये झळकणार या बाप-लेकाची जोडी, पहिल्यांदाच दिसणार एकत्र

अभिनव बिंद्रांच्या बायोपिकमध्ये झळकणार या बाप-लेकाची जोडी, पहिल्यांदाच दिसणार एकत्र

भारतीय नेमबाज अभिनव बिंद्रांच्या बायोपिकमध्ये अभिनेता अनिल कपूर आणि हर्षवर्धन पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.

  • Share this:

मुंबई, 17 फेब्रुवारी : बॉलिवूडमध्ये अनेक वडिल आणि मुलाच्या जोड्या आहेत. त्यातील अनेक जणांनी अनेक चित्रपटही एकत्र केलेत. आणि त्या चित्रपटांना चांगली पसंतीही मिळाली आहे. धर्मेंद्र-सनी-बॉबी, जितेंद्र-तुषार, अमिताभ-अभिषेक, जॉकी श्रॉफ-टायगर अशा अनेक जोड्यांनी एकत्र चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आणि ते चित्रपट गाजवले देखिल आहेत. त्यातच आता नव्याने येऊ घातलेली जोडी म्हणजे अभिनेता अनिल कपूर आणि त्यांचा मुलगा हर्षवर्धन कपूर.

ऑलिम्पिकमधील सुवर्ण पदक विजेता अभिनव बिंद्रा यांच्यावर आधारित बायोपिकचं शूटिंग सुरू झालं आहे. विशेष म्हणजे या बायोपिकमध्ये पहिल्यांदाच अनिल कपूर आणि हर्षवर्धन एकत्र काम कऱणार आहेत. अभिनेता हर्षवर्धन कपूर हा अभिनव बिंद्रांची भूमिका साकारणार आहे. तर अनिल कपूर अभिनव बिंद्रा यांच्या वडिलांची भूमिका साकारणार आहेत.

इतर बातम्या - निर्मात्याने 'लेडी आयुष्मान' म्हटल्यावर तापसी भडकली, दिलं हे उत्तर...

अनिल कपूर यांनी ट्विट दोघांच्या एकत्रित भूमिकेवर ट्विट केलं आहे. अनिल कपूर यांनी अभिनव बिंद्रा आणि हर्षवर्धनसोबतचे फोटो ट्विट करत असं म्हटलं आहे की, “The beginning”. अऩिल कपूर यांच्या या ट्विटचा अर्थ चित्रपटाची सुरुवात होत आहे असा जरी असला तरी बाप-लेकाची नवी जोडी बी-टाऊन मध्ये उदयास येतेय असाही होतो.

हर्षवर्धन कपूर यानेही यासंदर्भात ट्विट केलं होतं. त्याने ट्विट केलं होतं की, “ सुरुवात खूप खास असते. महत्वाचं म्हणजे तेव्हा जेव्हा आपल्याला अशा व्यक्तीची भूमिका साकारण्याची संधी मिळते. ज्या व्यक्तीने जगात आपल्या देशाचं नाव मोठ केलं आहे. मला आनंद होत आहे की मी अभिनव बिंद्रा यांची भूमिका साकारत आहे. मी या भूमिकेला न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन.”

इतर बातम्या - सारा अली खान म्हणते, ‘मी बोलायला लागले तर रोज नवे वाद होतील’

3 वर्षाच्या विलंबानंतर अखेर चित्रपटाचं शूटिंग सुरू कऱण्यात आलं आहे. अनिल कपूर यांनी ट्विट करत ही घोषणा केली आहे. अभिनव बिंद्राच्या “A Shot at history : my obsessive journey to Olympic gold and beyond“ या आत्मचरित्रावर या चित्रपटाची कथा आधारित आहे. हर्षवर्धन याने सप्टेंबर 2017 ला या चित्रपटाची घोषणा केली होती. आता अखेर 3 वर्षांनी या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.

First published: February 17, 2020, 10:52 AM IST

ताज्या बातम्या