असा असतो अंगद आणि नेहाचा दिवस, लग्नानंतर अभिनेत्री नेहा धुपिया कुठे आहे व्यग्र?

बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियाने गेल्यावर्षी अभिनेता अंगद बेदीसोबत लग्न करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. पण टेलिव्हिजनपासून दूर गेलेली नेहा सध्या काय करते जाणून घ्या

  • Share this:

बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियाने गेल्या वर्षी अभिनेता अंगद बेदीसोबत लग्न करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. 10 मे 2018 रोजी नेहा कुटुंबीय आणि काही जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत अंगदबरोबर लग्न बंधनात अडकली. लग्नाच्या काही महिन्यांनंतर नेहाने मुलीला जन्म दिला. नेहा सध्या तिचा संपूर्ण वेळ मुलगी मेहरच्या संगोपनासाठी देत आहे.

मुलीच्या येण्यानं नेहा आणि अंगदच्या जबाबदारीत भर पडली आणि त्या दोघांचं आयुष्य बदलून गेलं. अभिनेता अंगदला त्याच्या सध्याच्या आयुष्याबद्दल विचारल्यावर, अंगदने सध्या तो फार खूश असल्याचं म्हटलं.

पुढे अंगद असाही म्हणाला की, 'नेहाची विनोदबुद्धी फार छान आहे. स्वत: हसत हसत ती दुसऱ्यांनादेखील आनंदी ठेवते. माझ्या जीवनातील हे फार चांगले दिवस आहेत. आज काय जेवणं बनवण्याचं हे नेहा मला विचारते. अशा लहान गोष्टींमुळे आमचं नातं अधिक मजबूत होत आहे.'

लग्नाच्या आधी नेहा MTV Rodies आणि No Filter या शोमध्ये दिसली होती. पण लग्नानंतर तिने मोठ्या पडद्या आणि टेलिव्हिजनपासून ब्रेक घेतला आहे. सोशल मीडियावर नेहाच्या गरोदरपणाची प्रचंड चर्चा झाली होती. खरतर नेहा लग्नाच्या आधीच गरोदर राहिल्यामुळे तिच्यावर प्रचंड टीका झाली होती. पण या सगळ्यातून मार्ग काढत त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि आता त्यांचं आयुष्य फार सुंदर आहे.

नुकतेच अंगदने 'सुरमा' चित्रपटात काम केलं आहे. पण अंगद हा मोठ्या पडद्यावर फारसा गाजला नाही. गेल्या वर्षी अॅमेझॉनवर आलेल्या 'इनसाइड एज' या वेबसिरीजमध्ये तो झळकला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 19, 2019 05:20 PM IST

ताज्या बातम्या