Home /News /entertainment /

फारच खास आहे पायल-संग्रामची लग्नपत्रिका; पुन्हा-पुन्हा पाहिला जातोय INVITATION VIDEO

फारच खास आहे पायल-संग्रामची लग्नपत्रिका; पुन्हा-पुन्हा पाहिला जातोय INVITATION VIDEO

'लॉकअप' (Lock Upp) फेम अभिनेत्री पायल रोहतगी आणि कुस्तीपटू संग्राम सिंह (Payal Rohtagi & Samrat Singh) लवकरच लग्नगाठ बांधणार (Wedding) आहेत. सेलिब्रेटी कपल येत्या 9 जुलै 2022 रोजी लग्नबंधनात अडकणार आहे.

  मुंबई, 23 जून-   'लॉकअप' (Lock Upp) फेम अभिनेत्री पायल रोहतगी आणि कुस्तीपटू संग्राम सिंह  (Payal Rohtagi & Sangram Singh)   लवकरच लग्नगाठ बांधणार   (Wedding)  आहेत. सेलिब्रेटी कपल येत्या 9 जुलै 2022 रोजी लग्नबंधनात अडकणार आहे. याआधी दोघे गुजरात, राजस्थान किंवा हरियाणामध्ये लग्न करणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र नुकतंच संग्राम सिंह यांनी खुलासा करत आपण आग्रा येथील जेपी पॅलेसमध्ये लग्न करणार असल्याचं सांगितलं होतं. त्यांनतर आता दोघांची लग्नपत्रिका समोर आली आहे. सध्या कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपल्या चाहत्यांशी कनेक्टेड असतात. ते सतत आपल्या अपडेट्स चाहत्यांपर्यंत पोहोचवत असतात. दरम्यान नुकतंच पायल रोहतगीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या लग्नाची आमंत्रण पत्रिका शेअर केली आहे. ही लग्नपत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोक व्हिडिओवर जोरदार कमेंट करत आहेत आणि दोघांना लग्नाच्या शुभेच्छाही देत ​​आहेत. या लग्नपत्रिकामध्ये श्रीरामाचा उल्लेख करण्यात आला आहे. दोघांची ही लग्नपत्रिका अतिशय सुंदर आहे.
  नुकतंच एका मुलाखतीदरम्यान संग्राम सिंहने म्हटलं होतं, 'असं म्हणतात की भाग्य त्याची भूमिका अचूकपणे पार पाडतं. पायलला मी पहिल्यांदा आग्रा मथुरा रोडवर भेटलो होतो. आणि आता आग्रा येथीलच जेपी पॅलेसमध्ये 9 जुलैला आमचं लग्न होणार आहे. मेहंदी, हळदी, संगीत हे सर्व कार्यक्रम 3 दिवस चालणार आहेत. आग्रा येथे अनेक मोठी जुनी सांस्कृतिक मंदिरे आहेत. मंदिरात कुटुंबीयांच्या उपस्थितीत लग्न होणार आहे. आग्रा या शहराला प्रेमाचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. यानंतर आम्ही दिल्ली आणि मुंबईमध्ये रिसेप्शन आयोजित करू, यासोबतच हरियाणातील लोकांना मिठाई आणि लाडू देखील पाठवण्यात येणार आहेत. (हे वाचा:अभिनेत्रींना टक्कर देतेय दिग्दर्शक इम्तियाज अलींची लेक'; 'या' व्यक्तीला करतेय डेट ) लग्नाच्या डेस्टिनेशनबाबत बोलताना पायल रोहतगीने म्हटलं होतं, 'आग्रा हे ताजमहालसाठी ओळखलं जातं, परंतु आग्रामध्ये अशी अनेक हिंदू मंदिरे आहेत ज्यांच्याबद्दल आपल्याला माहिती नाही. आग्रा येथील लोकांना हिंदू मंदिरांची माहिती व्हावी, म्हणून आम्ही त्याठिकाणी लग्न करत आहोत. मला माझं लग्न पारंपरिक हिंदू पद्धतीनुसार करायचं आहे. आम्ही मुक्काम करत असलेल्या जेपी पॅलेसमध्ये सर्व मेहंदी, हळदी आणि संगीत विधी होणार आहेत. हा एक अतिशय खाजगी कार्यक्रम असेल, जिथे आमच्या जवळचे लोक उपस्थित असतील''.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Bollywood News, Entertainment, Wedding

  पुढील बातम्या