पुन्हा एकदा मिळतेय 'करोडपती' होण्याची संधी, बिग बींनी शेअर केली माहिती

पुन्हा एकदा मिळतेय 'करोडपती' होण्याची संधी, बिग बींनी शेअर केली माहिती

छोट्या पडद्यावर कौन बनेगा करोडपती लवकरच सुरू होणार आहे. या शोची तयारी सुरू झालीय. बाॅलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लाॅगवरून ही माहिती शेअर केलीय.

  • Share this:

मुंबई, 29 मार्च : छोट्या पडद्यावर कौन बनेगा करोडपती लवकरच सुरू होणार आहे. या शोची तयारी सुरू झालीय. बाॅलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लाॅगवरून ही माहिती शेअर केलीय. त्यांनी लिहिलंय, केबीसीची तयारी सुरू झालीय. याची ओळख, सिस्टिम, नवं इनपुट शिकायला सुरुवात झालीय. दुसऱ्या वर्षाची तयारी सुरू झालीय. त्याबरोबर 11व्या सिझनची तयारी सुरू झालीय.

काही दिवसांपूर्वी 10वा सिझन संपला. या सिझनवर प्रेक्षकांनी खूप प्रेम केलं. अमिताभ बच्चन आणि केबीसी हे समीकरणच झालंय.गेले 9 सिझन बिग बींंची प्रेक्षकांमध्ये क्रेझ आहे. त्यांना हाॅट सिटपर्यंत यायचं असतं कारण बिग बींशी बोलायला संधी मिळेल म्हणून.

दर वेळी नव्या टॅगलाइनबरोबर येणाऱ्या या शोची वाट प्रेक्षक पाहत असतात. या शोची लोकप्रियताही अफाट. हा टक्कर देतो बिग बाॅस या शोला. आता सगळ्यांना उत्सुकता आहे 11व्या सिझनची.

केबीसीमध्ये फक्त प्रश्नोत्तरे नसतात, तर अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यातले अनेक किस्सेही ऐकायला मिळतात. अमिताभ यांनीसुद्धा ते बीएससीच्या परीक्षेत फिसिक्स विषयात नापास झाल्याचं सांगितलं. त्यानंतर पुन्हा परीक्षा दिल्यावर ते पास झाल्याची कबुली त्यांनी दिली. रवी यांच्या येण्याने अमिताभजींच्या कॉलेज आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला.

गेल्या भागात दर शुक्रवारी कर्मवीर हा एपिसोड असायचा.त्यात एकदा पद्मश्री सुधा वर्गिस यांची उपस्थिती होती. तळागाळातल्या लोकांसाठी सुधा वर्गिस काम करतात. बिहारमध्ये त्या सायकलवाली दीदी म्हणून ओळखल्या जातात. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या कार्यांचं कौतुक केलं.

या महत्त्वाच्या भागात सुधा वर्गिस यांच्या सोबत अनुष्का शर्माही होती. या भागात बिग बी अनुष्का शर्माची खूप प्रेमळ थट्टाही केली होती. सर्वसामान्य आणि स्टार्स या सगळ्यांबरोबर बिग बींचं मेतकुट चांगलं जमतं.

VIDEO: लोकलमधल्या हुल्लडबाजांचं करायचं काय? दोघांना अटक

First published: March 29, 2019, 12:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading