बिग बी आणि आमिर म्हणतायत वशमल्ले, तुम्ही पाहिलंत?

बिग बी आणि आमिर म्हणतायत वशमल्ले, तुम्ही पाहिलंत?

अमिताभ बच्चन आणि आमिर खान पहिल्यांदाच सिनेमात एकत्र काम करतायत. आणि या सिनेमातलं एक मोठं सरप्राईझ बाहेर आलंय.

  • Share this:

मुंबई, 17 आॅक्टोबर : या दिवाळीत सिनेरसिकांना मोठी ट्रीट आहे. 'ठग्ज आॅफ हिंदोस्तान' सिनेमा रिलीज होतोय. अमिताभ बच्चन आणि आमिर खान पहिल्यांदाच सिनेमात एकत्र काम करतायत. आणि या सिनेमातलं एक मोठं सरप्राईझ बाहेर आलंय.

सिनेमात बिग बी आणि आमिर खान यांच्यावरचं गाणं रिलीज करण्यात आलंय. वशमल्ले म्हणत दोघांनीही या गाण्यात एकच धमाल केलीय. प्रभुदेवानं या गाण्याची कोरिओग्राफी केलीय.

अगर आजादी है गुन्हा, तो मंजूर है सजा... असेच भारदस्त डायलाॅग्ज ऐकायला मिळणार आहेत. 1795मधली ही कथा. ब्रिटिश राजवटी विरोधात भारतीयांनी पुकारलेलं बंड. ते मोडून काढण्यासाठी ब्रिटिशांनी नेमलेला फिरंगी. फिरंगी विरुद्ध आजाद असं फुंकलं गेलं रणशिंग.

हे सगळं पहायला मिळणार आहे नोव्हेंबरमध्ये. ' ठग्ज आॅफ हिंदोस्तान' सिनेमात. याचा ट्रेलर रिलीज झाला. लार्जर दॅन लाईफ शाॅट्स, जबरदस्त अॅक्शन्स, भारदस्त डायलाॅग्ज हे सर्व पाहून रसिक प्रेक्षक भारावूनच गेलेत. ट्रेलर इतका भव्य दिव्य, तर मग सिनेमा किती असेल, याचा विचार सगळे करतायत.

यश चोप्रांच्या जन्मदिनी हा ट्रेलर रिलीज केला गेला. यशराज फिल्म्सच्या इतिहासात हा सर्वात महागडा सिनेमा आहे. दिवाळीत 8 नोव्हेंबरला तो रिलीज होईल.

'ठग्ज आॅफ हिंदोस्तान'चा ट्रेलर पाहिल्यानंतर हाॅलिवूडचा सुपरहिट सिनेमा पाइरेट्स ऑफ कॅरेबियनची आठवण करून देतो. पायरेट्स...मधला जाॅनी डेप अर्थात कॅप्टन जॅक्स पॅरो आणि फिरंगी आमिरमध्ये भलतंच साम्य आहे. तर बारबोसा किंवा पाचव्या भागातील वर्ल्ड अँडमधील व्हिलन मॅकशेनसारखा बिग बींचा लूक वाटतोय.

अमिताभ बच्चन आणि आमिर खान यांच्या गाण्यानं सिनेमात आणखी रंग भरले गेले.

दबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव

First published: October 17, 2018, 12:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading