मुंबई, 4 जुलै- बॉलिवूड बिग बी अमिताभ बच्चन (
Amitabh Bachhan) यांच्यासोबत ‘झुंड’
(Jhund) या चित्रपटात एक अभिनेता झळकला होता. त्याचं नाव प्रियांशु म्हणजेच बाबू रवी क्षेत्री असं आहे. अवघ्या 20 वर्षांचा हा कलाकार आहे. त्याला वाईट संगतीमुळे काही वाईट सवयी जडल्या होत्या. त्यातीलचं एक सवय म्हणजे चोरी करने. याच सवयीमुळे आज त्याला जेरबंद व्हाव लागलं आहे.
अमिताभ बच्चन यांच्या ‘झुंड’ या चित्रपटात उत्तम भूमिका साकारत तो चर्चेत आला होता. त्याला फुटबॉल खेळण्याची सुद्धा प्रचंड आवड आहे. मात्र हलाखीची परिस्थिती आणि वाईट संगती यामुळे प्रियांशु चुकीच्या मार्गावर गेला होता. गेल्या अनेक दिवसांपासून तो चोरीसारखे गैरप्रकार करू लागला होता. तो आपल्या मित्रांच्या साथीने रेल्वेमध्ये चोरी करत होता. त्याचे वडील मजूरीचं काम करतात. तर त्याला तीन बहिणीसुद्धा आहेत. त्याला फुटबॉलची आवड असली तरी तो वाईट संगतीमुळे आपल्या रस्त्यावरून भरकटला आहे.
(हे वाचा:
'हातात बंदुक आणि रक्ताने माखलेला शर्ट'; आदित्यची अवस्था पाहून थक्क झाले चाहते)
प्रियांशु हा मेकोसाबग या ठिकाणी राहतो. त्याला थेट अमिताभ बच्चनसोबत काम करण्याची संधी मिळाल्याने तो आपल्या भागामध्ये खुपचं प्रसिद्ध झाला होता. मात्र त्याच्या वाईट संगतीमुळे त्याची ही अवस्था पाहून लोक दुख व्यक्त करत आहेत. जेव्हा रेल्वे मध्ये थांबत असे तो आपल्या मित्रांसोबत प्रवाशाचे मोबाईल लंपास करत असे. मात्र आज त्याला व त्याच्या साथी दारांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी तब्बल 11 मोबाईल जप्त केले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.