आलिया भट आणि रणबीर कपूरचं लग्न? VIRAL PHOTOचं हे आहे सत्य

आलिया भट आणि रणबीर कपूरचं लग्न? VIRAL PHOTOचं हे आहे सत्य

सोशल मीडियावर रणबीर आणि आलियाच्या लग्न सोहळ्याचा एक फोटो तुफान व्हायरल होत आहे.

  • Share this:

मुंबई, 05 सप्टेंबर : बॉलिवूडची क्युट गर्ल आलिया भट आणि चॉकलेट बॉय रणबीर कपूर यांच्या अफेअरच्या कित्येक चर्चा आतापर्यंत आपण ऐकल्या असतील. 'कॉफी विथ करण' या शोमध्ये आलियानं रणबीरसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची हिंटदेखील दिली होती. प्रेमाची कबुली दिल्यानंतर हे कपल कित्येक कार्यक्रम, शोमध्ये एकत्रित पाहायलादेखील मिळाले. कपूर-भट कुटुंबीयांमध्येही चांगलीच जवळीक निर्माण झाली आहे.

यादरम्यान, सोशल मीडियावर रणबीर आणि आलियाच्या लग्न सोहळ्याचा एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे.

व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये आलिया अगदी नव वधूप्रमाणे नटल्याचं पाहायला मिळत आहे. तर बोहल्यावर चढणाऱ्या नवऱ्याप्रमाणेच रणबीरचाही हॉट लुक समोर आला आहे. हा फोटो रणबीर आणि आलियाच्या एक फॅनपेजनं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

(वाचा  : 'दो दिल मिल रहे है...' अर्जुन कपूरचा 'तो' फोटो होतोय व्हायरल)

हा फोटो व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. रणबीर आणि आलियाचं खरंच लग्न झालं? याच प्रश्नाचं प्रत्येक जण आतुरतेनं वाट पाहत होता.

(वाचा : नवरी नटली…! आलिया भटचा ब्रायडल लुक सोशल मीडियावर VIRAL)

पण या फोटोमागील सत्य समजल्यानंतर तुमची थोडीशी निराशा होईल. कारण हा फोटो खरा नसून फेक असल्याची माहिती समोर आली आहे. या फोटोमध्ये असलेली आलिया खरी आहे. पण या फोटोमध्ये फोटोशॉपद्वारे रणबीर कपूरचा समावेश करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी आलियाचे ब्रायडल लुकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. यावरून आलिया आणि रणबीरच्या लग्नाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. पण खरंतर एका ब्रँडसाठी आलियानं हे फोटोशूट केलंय. या जाहिरातीत आलिया अगदी नव्या नवरीप्रमाणे दिसत आहे आणि यामध्ये रणबीरऐवजी दुसराच मॉडेल यामध्ये आहे. इंटरनेटवर काही जणांनी फोटो मॉर्फ करून जाहिरातील मॉडेलऐवजी रणबीरला तेथे दाखवलंय. दरम्यान, काही दिवसांपासून रणबीर आणि आलियाच्या लग्नाच्या अफवा पसरत आहेत. पण अधिकृतरित्या या दोघांकडून लग्नाबाबत कोणतंही विधान करण्यात आलेलं नाही.

(वाचा : रानू मंडलबाबत विचारल्यावर लता मंगेशकर म्हणाल्या...)

पाळणा चोरण्याच्या नादात बाळाला मॉलमध्येच विसरून आली महिला, CCTV व्हायरल

Published by: Akshay Shitole
First published: September 4, 2019, 4:00 PM IST

ताज्या बातम्या