Home /News /entertainment /

Alia Bhatt आणि Ranbir Kapoor च्या लग्नाची नवी तारीख आली समोर, काहीच दिवसात चढणार बोहल्यावर?

Alia Bhatt आणि Ranbir Kapoor च्या लग्नाची नवी तारीख आली समोर, काहीच दिवसात चढणार बोहल्यावर?

सुरुवातीला अशी माहिती समोर आली होती की हे Alia Bhatt आणि Ranbir Kapoor यावर्षी डिसेंबरमध्ये बोहल्यावर चढेल, नंतर असं समोर आलं की सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये दोघांचं लग्न होऊ शकतं. आता या सोहळ्याची नवी तारीख समोर आली आहे

  मुंबई, 26 मार्च: 'गंगुबाई काठियावाडी', 'RRR' असे बॅक टू बॅक हिट देणारी अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt Latest Movies) सध्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. दरम्यान अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर लवकरत लग्न करणार (Alia Bhatt and Ranbir Kapoor Wedding Date) असल्याचं वृत्त तुम्ही वाचलं असेलच. पण आता या कपलच्या चाहत्यांना त्यांचं लग्न कधी होणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांचं लग्न कधी होणार याबाबत अंदाज बांधला जात आहे. सुरुवातीला अशी माहिती समोर आली होती की हे कपल यावर्षी डिसेंबरमध्ये बोहल्यावर चढेल, नंतर असं समोर आलं की सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये दोघांचं लग्न होऊ शकतं. पण लेटेस्ट मीडिया रिपोर्टनुसार अशी माहिती मिळते आहे की, रणबीर-आलिया काहीच दिवसात अर्थात पुढील महिन्यात एप्रिल 2022 (Alia Bhatt and Ranbir Kapoor marriage date) मध्ये लग्न करू शकतात. दरम्यान कोणतीही अधिकृत निश्चित तारीख समोर आलेली नाही आहे. हे वाचा-RRR Box Office Collection: पहिल्याच दिवशी RRR ने बॅटमॅनला पछाडलं, केली रेकॉर्डब्रेक कमाई आलिया आणि रणबीर हे कपल ऑनस्क्रीन आतापर्यंत एकत्र दिसलं नाही आहे. मात्र लवकरच ते 'ब्रह्मास्त्र' या सिनेमात स्क्रीन शेअर करणार आहेत. आलियाच्या वाढदिवशी तिचा या सिनेमातील लुक देखील रीव्हिल करण्यात आला होता. या कपलला ऑनस्क्रीन बघण्याची तर चाहत्यांना अशी इच्छा आहेच, पण त्यांच्या लग्नाबाबत चाहते अधिक उत्सुक आहेत. आरआरआर म्हणा किंवा गंगुबाई काठियावाडी म्हणा, या दोन्ही सिनेमांच्या प्रमोशन दरम्यान आलियाला रणबीरबाबत अनेकदा प्रश्न विचारण्यात आले होते. तिनेही या सर्व प्रश्नांची स्पष्ट उत्तरं दिली होती. त्यामुळे या कपलने लवकरात लवकर लग्न करावे अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.
  बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अशी जोरदार चर्चा आहे की, एप्रिल 2022 मध्ये हे कपल लग्न करेल. इंडिया टुडे ने याविषयी वृत्त दिले आहे. मीडिया अहवालात सूत्रांच्या माहितीनुसार असे म्हटले आहे की, रणबीर कपूरची आहे अभिनेत्री नीतू कपूर यांना सेलेब्रिटी डिझायनर मनिष मल्होत्राच्या स्टोअरमध्ये स्पॉट करण्यात आले आहे. तर मनिष मल्होत्रा देखील त्यांच्या घरी आला होता. मिळालेल्या माहितीनुसार शूटिंगमध्ये व्यस्त असणाऱ्या या कपलने आपापल्या फिल्म्सच्या शेड्यूलमधून सुट्टी देखील मागितली आहे.
  2021 मध्येच झालं असतं लग्न रिपोर्ट्सनुसार, अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांचे लग्न 2021 सालीच होण्याची योजना होती. मात्र कोरोनामुळे या देखील लग्नात विघ्न आलं. रणबीर एका मुलाखतीत असं म्हणाला होता की कोरोना पँडेमिक नसतं तर त्याने आलियाशी केव्हाच लग्न केलं असतं. आलियाला जेव्हा याविषयी विचारण्यात आले त्यावेळी ती म्हणाली की, 'त्याचं म्हणणं बरोबर आहे मात्र मी माझ्या डोक्यात रणबीरशी केव्हाच लग्न केलं आहे. खूप काळ आधीपासूनच मनातून मी रणबीरशी लग्न केलं आहे. सर्वकाही घडण्याची एक वेळ असते. जेव्हा केव्हा आम्ही लग्न करू तेव्हा ते योग्य आणि सुंदर असेल'.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published:

  Tags: Alia Bhatt, Ranbir kapoor

  पुढील बातम्या