आलिया भट आणि रणबीरनं 'असं' साजरं केलं थर्टीफर्स्ट

आलिया भट आणि रणबीरनं 'असं' साजरं केलं थर्टीफर्स्ट

सेलिब्रिटींचे नव्या वर्षाच्या स्वागताचे प्लॅन्स वेगवेगळे असतात. कुणी भारतातच स्वागत करतं तर कुणी परदेशात जाऊन सेलिब्रेशन करतं. रणबीर आणि आलियाचं हे थर्टीफर्स्ट खास होतं.

  • Share this:

मुंबई, 01 जानेवारी : सेलिब्रिटींचे नव्या वर्षाच्या स्वागताचे प्लॅन्स वेगवेगळे असतात. कुणी भारतातच स्वागत करतं तर कुणी परदेशात जाऊन सेलिब्रेशन करतं. रणबीर आणि आलियाचं हे थर्टीफर्स्ट खास होतं.

सध्या दोघांचा एक फोटो व्हायरल होतोय. सध्या ब्रम्हास्त्र सिनेमाचं शूट न्यूयाॅर्कला सुरू आहे. शिवाय ऋषी कपूरही तिथेच उपचार घेतायत. आलिया आणि रणबीर सध्या तिथेच आहेत.

शूटमधून वेळ काढून दोघांनी थर्टीफर्स्टची संध्याकाळ साजरी केली. न्यूयाॅर्कला फिरताना त्यांना फारसं कुणी ओळखणारं नसतं. त्यामुळे ते निवांत फिरू शकतात. पण यावेळी काही भारतीयांनी त्यांना पाहिलं आणि मग त्यांच्या सोबत फोटो काढणं साहजिकच आहे.तोच फोटो सध्या व्हायरल होतोय.

आलिया आणि रणबीर दोघंही एकमेकांवर खूप प्रेम करतात. त्यांच्या बाॅडी लँग्वेजमधून ते चांगलंच जाणवतंही. आता रणबीरनं अशी एक गोष्ट केलीय ज्यामुळे त्यांच्या नात्यांवर शिक्कामोर्तब होतंय. रणबीरचा फॅमिली चॅट ग्रुप आहे. त्यात त्यानं आलियाला अॅड केलंय. त्या ग्रुपमध्ये ऋषि कपूर, नीतू कपूर, रिद्धिमा कपूर साहनी आणि रीमा जैन आहेत.

मध्यंतरी, 'नितूला आवडते, मला आवडते, रणबीरला आवडते, समजलं?' काही दिवसांपूर्वी ऋषी कपूरनं म्हटलं होतं. त्यानंतर सोनी राझदानसाठी रणबीर हा 'लव्हली लव्हली बाॅय' आहे. हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांना आलिया-रणबीरबद्दल जी चर्चा किंवा अफवा आहे त्याबद्दल विचारलं असता त्या म्हणाल्या, 'मी माझ्या मुलीशी थेट बोलू शकते.'

PHOTOS : हृतिक पुन्हा एकदा सुझान आणि मुलांसोबत!

First published: January 1, 2019, 1:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading