मुंबई, 31 ऑगस्ट : बॉलिवूडच्या मिस्टर खिलाडी अक्षय कुमार अॅडव्हेंचरचा थरार अनुभवताना आपल्याला लवकरच दिसणार आहे. बेयर ग्रिल्स सोबतचा एक व्हिडीओ अक्षय कुमारनं शेअर केला आहे. Into The Wild या शोमध्ये बेयर ग्रिल्ससोबत अक्षय कुमार दिसणार आहे. या शोचा प्रोमो आला असून नुकताच अक्षयने आपल्या इन्स्टा अकाऊंटवर पोस्ट केला आहे.
बेयर ग्रिल्सने याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रसिद्ध अभिनेता रजनीकांत सोबत जंगलात अॅडव्हेंचर केलं होतं. त्यानंतर आता अक्षय कुमार या शोमध्ये दिसणार आहे. खिलाडी अक्षय कुमारचा हा अॅडव्हेंचरस प्रवास पाहण्यासाठी त्याचे चाहते आणि डिस्कव्हरी चॅनलच्या प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या शोचा नवीन प्रोमो आला आहे. यामध्ये अक्षय कुमार थरारक अनुभव घेताना दिसत आहे.
हे वाचा-मोठी बातमी! अभिनेता सुबोध भावेसह पत्नी आणि मुलाला कोरोनाची लागण
या प्रोमोमध्ये अक्षय कुमार बेयर ग्रिल्ससोबत जंगलात, नदी पार करताना वेगवेगळे अनुभव घेताना दिसत आहेत. यामध्ये त्यांना येणारी संकट आणि त्यावर ते दोघंही कसे मात करतात हे या शोमध्ये पाहायला मिळणार आहे. या प्रोमोमध्ये अक्षय कुमार रिव्हर क्रॉसिंग करताना, जंगलात फिरताना आणि त्यासोबतच वेगवेगळे स्टंट करताना दिसत आहे.
या शोचं प्रसारण 11 सप्टेंबरला डिस्कव्हरी चॅनलवर केलं जाणार असून चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता आहे. अक्षयचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुरळा उडवतात. चित्रपटापेक्षाही जास्त हा शो पाहण्यासाठी देखील चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.