...आणि म्हणून आपल्या सगळ्यात खास वर्दीचा अक्षय कुमार करणार लिलाव

बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमारने 'रुस्तम' या सुपरहिट चित्रपटात परिधान केलेल्या नौसेनेच्या वर्दीचा सामाजिक कार्यासाठी लिलाव करण्याचं जाहिर केलं गेलय.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: Apr 28, 2018 11:52 AM IST

...आणि म्हणून आपल्या सगळ्यात खास वर्दीचा अक्षय कुमार करणार लिलाव

28 एप्रिल : बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमारने 'रुस्तम' या सुपरहिट चित्रपटात परिधान केलेल्या नौसेनेच्या वर्दीचा सामाजिक कार्यासाठी लिलाव करण्याचं जाहिर केलं गेलय. या लिलावातून मिळणाऱ्या रक्कमेचा वापर मानवी कल्याणासाठी केला जाणार असल्याचं बोललं जातय. अक्षयने नुकतच त्याच्या ट्विटवरुन हे घोषित केलं.

अक्षयने एक फोटो ट्विट केला आणि लिहिले की, 'रुस्तम या चित्रपटात मी परिधान केलेली वर्दी जिंकण्याची संधी. बोली २६ मे रोजी बंद होणार आहे.

अक्षने पुढे लिहिलं की, 'सर्वांना नमस्कार, मी ही घोषणा करताना उत्साहित आहे की, तुम्ही खऱ्याखुऱ्या नौसेनेची वर्दी मिळविण्यासाठी बोली लावू शकता. तीच वर्दी जी मी रूस्तममध्ये परिधान केली होती. 'तुम्हाला ही वर्दी हवी असल्याच तुम्ही सुद्धा ही बोली लावू शकता.'

 

 

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 28, 2018 11:52 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...