...म्हणून पुलवामाच्या शहीद कुटुंबानं मानले अक्षय कुमारचे आभार

...म्हणून पुलवामाच्या शहीद कुटुंबानं मानले अक्षय कुमारचे आभार

एकीकडे विंग कमांडर अभिनंदन यांच्या भारत वापसीचा आनंद साजरा होतोय, तर दुसरीकडे पुलवामा इथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या CRPF जवानांचं दु:खही कोणी विसरलं नाहीय.

  • Share this:

मुंबई, 01 मार्च : एकीकडे विंग कमांडर अभिनंदन यांच्या भारत वापसीचा आनंद साजरा होतोय, तर दुसरीकडे पुलवामा इथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या CRPF जवानांचं दु:खही कोणी विसरलं नाहीय. बाॅलिवूड स्टार्सनी शहीद परिवारांची मदत केली. अनेक जण पुढे आले. अक्षय कुमारनंही एका कुटुंबाला मदत केली.  खुद्द शहिदाच्या कुटुंबानं अक्षय कुमारला धन्यवाद म्हटलंय.

अक्षय कुमारनं पुलवामा इथे शहीद झालेला जवान जीतराम गुर्जरच्या कुटुंबाला 15 लाख रुपयांची मदत केलीय. सीआरपीएफच्या डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल जगदीश नारायण मीना यांनी ही माहिती दिलीय. अक्षय कुमारनं हे डोनेशन भारताच्या वीर ट्रस्टतर्फे दिलंय. अक्षयनं याआधीही वीर ट्रस्टला 5 कोटी रुपये दिले होते. अक्षयनं ट्विटरवरून लोकांना शहिदांच्या कुटुंबाला मदत करायचं अपिल केलं होतं.

अक्षयच्या फॅन्सनी तर त्याचं कौतुक केलंच, पण शहीद कुटुंबानंही अक्षयचे आभार मानलेत. शहीद जीतरामचे छोटे भाऊ विक्रम सिंह यांनी सांगितलं की ते या कुटुंबात कमावणारे एकटेच होते. या मदतीची त्यांच्या कुटुंबाला गरज होतीच.

विक्रम सध्या स्पर्धा परीक्षा देतायत. शहीद जीतराम यांच्या कुटुंबात त्यांचे वृद्ध आईवडील आणि पत्नी, दोन मुली आहेत.

अक्षय कुमार केसरी सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. 1897मध्ये झालेल्या सारागढच्या युद्धावर केसरी हा सिनेमा आहे. त्यावेळी 21 बहादूर शीख सैनिकांनी अफगाणच्या 10 हजार सैनिकांशी मुकाबला केला होता. राजकुमार संतोषींचं दिग्दर्शन असलेला बॅटल आॅफ सारागढी हा सिनेमाही तयार होतोय. तर केसरीचं दिग्दर्शन अनुराग सिंग करतोय. करण जोहरची निर्मिती आहे.

Loading...

अक्षय कुमार नेहमीच अनेकांना आर्थिक मदत करत असतो.


बाॅलिवूडशिवाय कंगाल होतील 'हे' पाकिस्तानी कलाकार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 1, 2019 02:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...