मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /3 मुस्लिम देशांत अक्षय कुमारचा Bell Bottam बॅन; 'या' कारणामुळे बेल बॉटम वादात

3 मुस्लिम देशांत अक्षय कुमारचा Bell Bottam बॅन; 'या' कारणामुळे बेल बॉटम वादात

3 देशात प्रदर्शित होणार नाही बेल बॉटम

3 देशात प्रदर्शित होणार नाही बेल बॉटम

3 अरब देशांनी बेल बॉटम (Bell Bottam) फिल्म प्रदर्शनावर बंदी घातली आहे.

    मुंबई, 23 ऑगस्ट :  कोरोनाच्या संकटानं घरातच अडकून पडलेले नागरिकही आपल्या आवडत्या अभिनेत्याच्या चित्रपटाच्या प्रतीक्षेत आहेत. अशा परिस्थितीत बॉलिवूड स्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) याचा बेल बॉटम (Bell Bottam) हा चित्रपट नुकताच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे, देशात याला चांगला प्रतिसाद मिळत असला तरी याच्या परदेश वारीत मात्र अडथळे आले आहेत.

    बॉलिवूड चित्रपटांना अरब देशांसह अमेरिका, रशिया, इग्लंड आदी देशांमध्येही मोठा प्रेक्षकवर्ग मिळतो. त्यामुळे हे चित्रपट परदेशातही मोठी कमाई करतात. अक्षय कुमारच्या बेलबॉटम फिल्मने भारतात बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत 8 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. मात्र या चित्रपटात काही घटना चुकीच्या पद्धतीनं दाखवल्यानं सौदी अरेबिया (Saudi Arabia), कुवेत (Kuwait) आणि कतार (Katar) या अरब देशांनी हा चित्रपट प्रदर्शित करण्यास मनाई केली आहे.

    हे वाचा - राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पाचा पहिला Video; योगा करताना सकात्मकतेचा संदेश

    रंजीत एम तिवारी दिग्दर्शित हा एक स्पाय थ्रिलर (Thriller) चित्रपट असून 1980 च्या दशकात घडलेल्या विमान अपहरणाच्या (Aeroplan Hijack) सत्य घटनेवर आधारीत आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसह लारा दत्ता, वाणी कपूर आणि हुमा कुरेशी आदी तगडी स्टारकास्ट आहे. अक्षय कुमार रॉ (RAW) या भारतीय गुप्तहेर संघटनेच्या अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे.

    1984 मध्ये लाहोरवरून भारताच्या दिशेनं निघालेल्या विमानाचं दहशतवाद्यांनी अपहरण केलं आणि ते विमान दुबईत नेण्यात आलं होतं. या विमानात 210 लोक होते. त्यांना ओलीस धरण्यात आलं होतं. या चित्रपटात अपहरणकर्त्याशी चर्चा करून आणि नंतर लढाई करून अक्षय कुमार आणि त्याचे सहकारी लोकांना वाचवतात असं दाखवण्यात आलं आहे. याला या अरब देशांनी आक्षेप घेतला आहे.

    हे वाचा - तालिबानमुळे क्रिकेटपटूशी होणारे लग्न मोडणार, 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीला भीती

    या अपहरण झालेल्या विमानातील लोकांना वाचवण्यासाठी यूएईचे (UAE) मंत्री शेख मोहमद बिन राशीद अल मकतुम (Shaikh Mohamad Bin Rashid Al Maktum) यांनी स्वतः पुढाकार घेऊन परिस्थिती हाताळली होती. अपहरणकर्त्यांनादेखील त्यांनी पकडलं होतं, असा या देशांचा दावा आहे. मात्र चित्रपटात वेगळं दाखवण्यात आल्यानं या देशांनी हा चित्रपट आपल्या भूमीवर प्रदर्शित होण्यास बंदी घातली आहे. यामुळे या देशांत राहणारे हिंदी चित्रपटांचे चाहते आणि अक्षय कुमारचे चाहते यांना हा चित्रपट पाहता येणार नाही.

    First published:
    top videos

      Tags: Akshay Kumar, Bollywood, Entertainment