Home /News /entertainment /

अक्षय कुमारचा 'Laxmii' दोन दिवसातच झाला लीक, टेलिग्रामवर पायरेटेड कॉपी व्हायरल

अक्षय कुमारचा 'Laxmii' दोन दिवसातच झाला लीक, टेलिग्रामवर पायरेटेड कॉपी व्हायरल

प्रदर्शनाआधीपासून वादात सापडलेल्या अक्षय कुमारच्या 'लक्ष्मी' (Akshay Kumar Starr Laxmii) चित्रपटासमोर नवे संकट उभे राहिले आहे

    मुंबई, 12 नोव्हेंबर: बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि कियारा  अडवाणी (Kiara Advani) यांचा लक्ष्मी (Laxmii) हा हॉरर कॉमेडी चित्रपट 9 नोव्हेंबरला डिस्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. सिनेमाच्या नावापासून यातील पात्रांपर्यंत विविध गोष्टींसाठी हा सिनेमा प्रदर्शनाआधीपासूनच वादात सापडला होता. दीर्घकाळानंतर सिनेमागृहं सुरू होऊनही 'लक्ष्मी' थिएटरमध्ये प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण प्रदर्शनानंतर केवळ दोनच दिवसांत तमिलरॉकर्स (TamilRockers) या बेकायदेशीररित्या चित्रपट चोरून ऑनलाइन स्ट्रीम करणाऱ्या वेबसाइटवर लक्ष्मी हा चित्रपट लीक झाला आहे. India.com  या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार लक्ष्मी हा चित्रपट Telegram, MovieRulz आणि इतर वेबसाइट्सवरही लीक झाला आहे. तमिलरॉकर्स या वेबसाइटवर अनेकदा बंदी घालण्यात आली आहे पण ती पुन्हा वेगळ्या डोमेन नेमने चालू होते असंही या अहवालात म्हटलं आहे. (हे वाचा-Laxmii बार ठरला फुसका; सोशल मीडियावर मीम्सचा धुमाकूळ) सरकारने अनेक नियम आणि कायदे करून चित्रपटांची पायरसी रोखण्याचा प्रयत्न केला आहे तरीही तमिलरॉकर्स चलाखीने पुन्हा हिंदी आणि इंग्रजी चित्रपट आपल्या वेबसाइटवर प्रदर्शित करत आहेत. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा सिनेमा ‘दिल बेचारा’ (Dil Bechara) डिस्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर मोफत उपलब्ध आहे, तरी देखील तमिलरॉकर्सने हा सिनेमा लीक केला होता. तमिलरॉकर्स ही वेबसाइट सगळे बडे चित्रपट नेहमची लीक करते आहे. कोणताही कंटेट रिलीज किंवा एअर झाल्यावर लगेचच या वेबसाइटकडून तो लीक केला जातो, जे की खूप घातक आहे. या लीक केलेल्या कंटेटची क्वालिटी नेहमी हाय-डेफिनेशन (HD) असते. त्यांनी पेंग्विन, पेट्टा, महर्षि, आयस्मार्ट शंकर, से रा नरसिंहा रेड्डी, डियर कॉम्रेड, साहो तसंच हिंदी मीडियम हे चित्रपटही लीक केले होते. (हे वाचा-एकता कपूर अडचणीत! वेब सीरिजमधून अश्लीलता पसरवल्याचा आरोप, चालणार खटला) मुनी 2 : कांचना (Muni 2: Kanchana) या 2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक म्हणजे 'लक्ष्मी'. या तमिळ चित्रपटात राघव लॉरेन्सने प्रमुख भूमिका केली होती आणि तोच हिंदी चित्रपटाचा दिग्दर्शकही आहे. लक्ष्मी चित्रपटात कियारा अडवाणी, शरद केळकर, अश्विनी काळसेकर, आएशा रझा, राजेश शर्मा आणि तरुण अरोरा यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाचं मूळचं नाव लक्ष्मी बॉम्ब असं होतं पण या नावाला आक्षेप घेतल्यानंतर निर्मात्यांनी प्रदर्शनापूर्वी ते बदलून केवळ लक्ष्मी ठेवलं.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Akshay Kumar, Bollywood

    पुढील बातम्या