अजय देवगणसमोर रणबीर-रणवीर झाले नापास, काय जिंकलं 'सिंघम'नं?

अजय देवगण बाॅक्स आॅफिसवर नेहमीच हिट असतो. पण आता त्यानं रणवीर सिंग, रणबीर कपूर, विकी कौशलपासून आमिरपर्यंत सगळ्यांनाच हरवलंय.

News18 Lokmat | Updated On: Feb 9, 2019 03:30 PM IST

अजय देवगणसमोर रणबीर-रणवीर झाले नापास, काय जिंकलं 'सिंघम'नं?

मुंबई, 09 फेब्रुवारी : अजय देवगण बाॅक्स आॅफिसवर नेहमीच हिट असतो. पण आता त्यानं रणवीर सिंग, रणबीर कपूर, विकी कौशलपासून आमिरपर्यंत सगळ्यांनाच हरवलंय. तुम्हाला प्रश्न पडला असेल की कशात? तर आम्ही सांगतोय करण जोहरच्या काॅफी विथ करणबद्दल.

हा शो आता संपत आलाय. सुरुवातीलाच करणनं सांगितलं होतं, जो कोणी सर्वात चांगलं उत्तर देईल, त्याला तो आॅडी कार भेट देणार आहे. कारण अजय देवगणनं सर्वात उत्तम उत्तर दिलं होतं.

अजय देवगण हा तसा रिझर्व्ह व्यक्ती म्हणून ओळखला जातो. काॅफी विथ करणमध्ये तो काजोलबरोबर आला होता. पण अजयनं दिलेल्या उत्तरानं करण जोहरची बोलतीच बंद झाली.

करणनं अजयला विचारलं, कुठल्या अंधविश्वासावर विश्वास ठेवल्यानं तुला गिल्टी वाटतं? त्यावर अजय म्हणाला होता, करण जोहरचे सिनेमे क अक्षरापासून असले की हिट होतात, यावर मी विश्वास ठेवला होता. पण 'काल' सिनेमा केल्यावर माझा विचार बदलला.

करण जोहरला हे उत्तर आवडलं आणि अजय देवगणलाच आॅडी द्यायचा त्यानं निर्णय घेतला. अजय देवगणला कार्सचा शोक आहे. त्याच्याकडे कार्सची बरीच कलेक्शन्स आहेत.

Loading...

करण जोहर आणि अजय देवगण यांचं भांडण जवळजवळ 2 वर्ष चाललं होतं.अजय देवगणचा 'शिवाय' आणि करणचा 'ऐ दिल है मुश्किल' एकाच दिवशी रिलीज झाला होता. त्यावेळी अजयनं करणवर पैसे देऊन तो अजयची इमेज खराब करतोय, हा आरोप केला होता.

अजय देवगणच्या बहुचर्चित 'तानाजी'मध्ये काजोलची भूमिका आहे. सिनेमाचं शूटिंगही सुरू झालंय. काजोल या सिनेमात अजय देवगणच्या बायकोची भूमिका करतेय. डीएनएच्या बातमीनुसार काजोलला सिनेमाची पटकथा आवडलीय. ती मराठी असल्यानं तानाजीच्या बायकोच्या भूमिकेसाठी योग्य असल्याचं काजोल म्हणाली.


#FitnessFunda : बाॅलिवूडचा रोमँटिक किंग फिटनेससाठी 'अशी' घेतो मेहनत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 9, 2019 03:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...