Year Ender 2018 : 'हे' सिनेमे पाहिले नसतील तर तुमचा चॉईस आहे चांगला

यंदाच्या चित्रपटांच्या यादीमध्ये काही असे सिनेमे जर तुम्ही पाहिले असतील तर तुम्हाला पश्चाताप नक्कीच झाला असेल. कारण या चित्रपटांनी प्रेक्षकांना नाराज करुन त्यांच्या अपेक्षांचा भंग केला आहे.

  • Share this:

अय्यारी : मनोज वाजपेयी आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या अय्यारी चित्रपटानं प्रेक्षकांचा अपेक्षाभंग केला. एका रॉ एजंट जीवनावर आधारित चित्रपटात मुख्य कलाकार अभिनयात कमी पडल्याचं प्रेक्षकांचं म्हणणं होतं. चित्रपट पाहिल्यानंतर सिनेमा कोणत्या आशयावर तयार केला आहे असा प्रेक्षकांना प्रश्न पडतो.

नमस्ते इंग्लंड : या चित्रपटाची कथा 'नमस्ते लंडन' सिनेमासारखीच आहे. आणि सिनेमाचं दिग्दर्शनही नमस्ते लंडनपेक्षा 10 पटीने वाईट होतं.

रेस 3: सलमान खानचा हा सिनेमा संवाद आणि अॅक्शन कार्टूनमध्ये असते तशी बालिश वाटत होती. कलाकारांना डायलॉग डिलिव्हरी योग्यरीत्या न जमल्यामुळे चित्रपटाच्या गंभीर संवादांची चेष्टा केली गेली आणि सिनेमाचे संवाद सोशल मीडियावर ट्रोल केले गेले.

साहेब बीवी और गँगस्टर 3 : या चित्रपटाने एखाद्या नवख्या कलाकाराचे करिअर संपवलं असतं. कारण चित्रपटात दोनच गोष्टी जास्त दिसत होत्या. एक म्हणजे प्रत्येक सीनमध्ये दारू पिण्याचा उल्लेख केला होता आणि दुसरं म्हणजे संपूर्ण सिनेमात सतत बंदुका चालवल्या जात होत्या. प्रेक्षक एक तर टाईमपास करण्यासाठी सिनेमा पाहायला आले असावेत किंवा संजय दत्तची स्टाईल पाहण्यासाठी आले असावे.

वेलकम टू न्यूयॉर्क : दिलजीत दोसांझ, सोनाक्षी सिन्हा, करण जोहरचा चित्रपट प्रेक्षकांना फारसा आवडला नाही. चित्रपटाची कथा लोकांना पटणारी नव्हती. दोन कंटेस्टंट एका विमाना भेटतात आणि प्रेक्षकांचा बदला घ्यायचं ठरवतात. बहुतेक यामुळेच सिनेमा प्रेक्षकांना फारसा आवडला नाही.

झिरो : बॉलिवूडचा बादशाह शाहरुखचा सिनेमा झिरो म्हणून ओळखला जाऊ शकतो याचा कोणी विचारही केला नव्हता. चित्रपटाचे दिग्दर्शक आनंद एल रायकडून फार अपेक्षा होत्या पण झिरो सिनेमातून त्या पूर्ण झाल्या नाहीत.

जलेबी : हा चित्रपट कधी न संपणाऱ्या ट्रेन प्रवासासारखा आहे. चित्रपट पाहिल्यानंतर मागील 15 मिनिटापूर्वी चित्रपटात काय घडलं हेच लक्षात येत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 27, 2018 02:55 PM IST

ताज्या बातम्या