Photos : ईशा अंबानीच्या संगीत सोहळ्याला पहिल्यांदाच दिसला हा नजारा

उद्योगपती मुकेश अंबानींची कन्या ईशा अंबानीच्या लग्नाचा संगीत सोहळा दणक्यात झाला. अख्खं बाॅलिवूड या सोहळ्याला उपस्थित होतं. बाॅलिवूडच्या काही जोड्यांनी पहिल्यांदाच एकत्र स्टेजवर परफाॅर्मन्स केला.

  • Share this:

उद्योगपती मुकेश अंबानींची कन्या ईशा अंबानीच्या लग्नाचा संगीत सोहळा दणक्यात झाला. अख्खं बाॅलिवूड या सोहळ्याला उपस्थित होतं. बाॅलिवूडच्या हस्तींनी संगीत सोहळ्याला चार चाँद लावले.

यावेळी पहिल्यांदाच स्टेजवर काही जोड्या डान्स करताना दिसल्या. रोमान्सचा बादशहा शाहरुख खानचा डान्स आपण नेहमीच पाहतो. पण यावेळी त्याच्या सोबत साथ द्यायला होती त्याची पत्नी गौरी खान. किंग खान आणि गौरीचं नृत्य पाहून डोळ्यांचं पारणंच फिटलं.

संगीत सोहळ्याला पहिल्यांदा शाहरुख-आमिर खानला एकत्र डान्स करताना पाहिलं. आमिर कधी अॅवाॅर्ड शोजना जात नाही. त्यामुळे स्टेजवर परफाॅर्मन्स देण्याचा प्रश्न येत नाही. पण यावेळी त्यानं स्टेजवर परफाॅर्म केलं, तेही शाहरुख खानबरोबर.

स्टेजवर तर सगळेच कलाकार होते. ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी डान्स केलाच. पण त्यावेळी स्टेजवर करिष्मा कपूरही होती. करिष्मा-अभिषेकचा साखरपुडा मोडला होता.

याशिवाय अमेरिकन पॉप सिंगर बियोंसेला या सोहळ्यासाठी खास आमंत्रण होतं. तिचा स्टेजवरचा परफाॅर्मन्स लाजवाब होता. तिच्या परफाॅर्मन्सचे पहा काही फोटोज

याशिवाय अमेरिकन पॉप सिंगर बियोंसेला या सोहळ्यासाठी खास आमंत्रण होतं. तिचा स्टेजवरचा परफाॅर्मन्स लाजवाब होता.तिच्या परफाॅर्मन्सचे पहा काही फोटोज

उद्योजक मुकेश अंबानींच्या कन्या ईशा अंबानीचा विवाह सोहळा राजस्थानातील उदयपूरमध्ये सुरू आहे. मेंदी आणि हळदीच्या कार्यक्रमाच्या आधी एक शानदार संगीत कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंत सर्व कलाकार हजर होते. कार्यक्रमाला अमेरिकेची पॉप स्टार बियोन्सेच्या परफॉरसन्सने चार चांद लावले होते.

 बियॉन्से खास ईशा अंबानीच्या संगीत कार्यक्रमासाठी भारतात आली होती. रविवारी सकाळी ती उदयपूरमध्ये दाखल झाली. रात्री झालेल्या संगीत कार्यक्रमात बियॉन्सेच्या परफॉरमन्सनं सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं.

या परफॉरमन्सनंतर बियॉन्सेनं तिचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. याशिवाय तिने कार्यक्रमात झालेल्या परफॉरमन्सची छोटीशी झलक एका क्लिपद्वारे शेअर केली आहे.

उदयपुरात रंगलेल्या कार्यक्रमात बियॉन्सेचा शानदार लुक पाहून सगळे थक्क झाले होते. कारण तिच्या वेस्टर्न लुकमध्ये एक देसी झलकदेखील पाहायला मिळाली. बियोन्सेच्या लुकचं वैशिष्ट्यं म्हणजे तिने डोक्यावर अस्सल भारतीय मांगटिका घातला होता.

बियॉन्सेने वेस्टर्न कपड्यांसोबतच दागिन्यांचं उत्तम ताळमेळ साधला होता. ज्यात ती फार सुंदर दिसत होती. बियॉन्सोच्या 'हाय स्लिट' ड्रेसमुळे अनेक डिझायनर्सना प्रेरणा मिळू शकते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 12, 2018 10:10 AM IST

ताज्या बातम्या