करण जोहर करणार 'गे लव्ह स्टोरीवर' आधारित सिनेमा

चित्रपट निर्माता करण जोहर 'तख्त' सिनेमानंतर गे लव्ह स्टोरीवर आधारित सिनेमा करणार असल्याची माहिती त्याने स्वत: एका मुलाखतीमध्ये दिली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jan 26, 2019 01:12 PM IST

करण जोहर करणार 'गे लव्ह स्टोरीवर' आधारित सिनेमा

मुंबई, 26 जानेवारी : बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर सध्या आगामी 'तख्त' सिनेमाच्या दिग्दर्शनात व्यग्र आहे. तख्त चित्रपटानंतर करण जोहर 'गे लव्ह स्टोरीवर' आधारित सिनेमा बनवण्याच्या विचारात आहे असं त्याने स्वत: एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. स्वित्झरलँडच्या दावोसमध्ये वर्ल्ड इकोनॉमिक फोरम कार्यक्रमात करणने हजेरी लावली होती यावेळी त्याने या आगामी सिनेमाबद्दल माहिती देत हा खुलासा केला आहे.

एका मुलाखतीमध्ये करणने सांगितलं की, 'वर्ल्ड इकोनॉमिक फोरमचे आत्तापर्यंत झाले, तिनही सेशन्समध्ये मी सहभागी होतो. तीनपैकी एक सेशन्स LGBTQ समुहाशी संबंधित होता म्हणजेच लेस्बियन, गे, बायसेक्स्युअल, ट्रान्सजेन्डर होय. या समुहाविषयी असलेला हा सेशन मला प्रचंड आवडला. या सेशनमध्ये भारत आणि सुप्रिम कोर्टाच्या नियम 377 बाबत अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या'

समलैंगिक समुहावर अधरित या सेशनमध्ये करणला अनेक प्रश्नही विचारण्यात आले. यावेळी एका पत्रकाराने LGBTQ समुहासाठी त्याला काय करायला आवडेल असा प्रश्न विचारला. तेव्हा करणने उत्तर दिले की, 'एक चित्रपट निर्माता असल्यामुळे मी एक समलैंगिक प्रेम कथेवर आधारित सिनेमा तयार बनवण्याचा विचार करतो आहे आणि या सिनेमासाठी मी दोन मोठ्या कलाकांची निवडही केली आहे, इतक्यात मला त्या कलाकारांची नाव सांगायची नाही पण मला या विषयावर चित्रपट करायला मला खरच फार आवडेल'

सध्या करण जोहर 'तख्त' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. या सिनेमात बॉलिवूडमधील तरुण कलाकार असणार आहेत. रणवीर सिंग, करीना कपूर, आलिया भट्ट, विकी कौशल, जान्हवी कपूर, भूमी पेडणेकर आणि अनिल कपूर असे कलाकार तख्त सिनेमात पाहायला मिळतील तसेच 2020 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे असं म्हटलं जात आहे.

VIDEO : कडाक्याची थंडी...जवानांचं धैर्य, लडाखमध्ये 18 हजार फुट उंचीवर फडकला तिरंगा!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 26, 2019 01:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...