मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

राखी सावंतनंतर हुमा कुरेशीने व्यक्त केली सोनू सूदला पंतप्रधान करण्याची इच्छा, वाचा नेमकं काय म्हणाली

राखी सावंतनंतर हुमा कुरेशीने व्यक्त केली सोनू सूदला पंतप्रधान करण्याची इच्छा, वाचा नेमकं काय म्हणाली

 राखी सावंतनेसुद्धा  (Rakhi Sawant) अभिनेता सोनू सूदला पंतप्रधान करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

राखी सावंतनेसुद्धा (Rakhi Sawant) अभिनेता सोनू सूदला पंतप्रधान करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

राखी सावंतनेसुद्धा (Rakhi Sawant) अभिनेता सोनू सूदला पंतप्रधान करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

मुंबई, 1 जून-  गेल्या दीड वर्षापासून थैमान घातलेल्या कोरोना (Corona Pandemic) संकटात सुरुवातीपासूनच मदतकार्यात आघाडीवर असणाऱ्या बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सोनू सूदनं (Sonu Sood) देशाचा पंतप्रधान (India’s Prime Minister) व्हावं अशी इच्छा अभिनेत्री हुमा कुरेशी (Huma Qureshi) हिनं व्यक्त केली आहे. याआधी राखी सावंत (Rakhi Sawant) हिनंही अशीच इच्छा व्यक्त केली होती.

View this post on Instagram

A post shared by Huma S Qureshi (@iamhumaq)

देशात गेल्या वर्षी कोरोना साथीमुळं देशभर लॉकडाउन (lockdown) लागू करण्यात आला होता. त्यावेळी पायी किंवा मिळेल त्या वाहनानं आपल्या घरी निघालेल्या लाखो-हजारो मजूरांच्या मदतीसाठी बॉलिवूड अभिनेता सोनू सूद पुढं सरसावला होता. हजारो मजुरांना घरी पोहोचवण्यासाठी त्यानं बसेसची सोय केली. त्यांना अन्नधान्यासह आर्थिक मदतही त्यानं केली. त्याचं हे मदतकार्य तेवढ्यापुरतं मर्यादित राहिलं नाही. त्यानं बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी एक अॅप तयार केलं. लोकांच्या मदतीसाठी एक कायमस्वरूपी यंत्रणा त्यानं निर्माण केली. आजही त्याचं मदतकार्य सुरू आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही तो मदतकार्यात आघाडीवर होता. ऑक्सिजनसाठी वणवण फिरणाऱ्या लोकांना मदत करण्याकरता त्यानं चीनकडे (China)मदत मागितली. आता फ्रान्समधून (France) त्यानं ऑक्सिजननिर्मिती प्लँटस (Oxygen Plants) मागवले असून लवकरच ते भारतात दाखल होतील.

(हे वाचा:'म्हणून Indian idol ला केलं रामराम'! सुनिधी चौहानचा आश्चर्यकारक खुलासा )

लोक त्याच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या मदतीची अपेक्षा करत असतात. त्याला शक्य होईल ती मदत तो करतो. कोरोना विषाणू संसर्गाच्या या महाभयंकर संकटात नि:स्वार्थपणे लोकांची सेवा करणाऱ्या सोनू सूदचं देशभर कौतुक होत आहे.बॉलिवूडमधील कलाकारदेखील त्याच्या कामाची प्रशंसा करत आहेत.

या सगळ्या पार्श्वभूमीवर त्याची फॅन असलेली अभिनेत्री हुमा कुरेशी हिनं नुकतीच एका मुलाखतीत सोनू सूदनं देशाचा पंतप्रधान (India’s Prime Minister) व्हावं अशी इच्छा व्यक्त केली आहे. राखी सावंत पाठोपाठ अशी इच्छा व्यक्त करणारी हुमा ही दुसरी अभिनेत्री आहे.

(हे वाचा:त्या' NUDE सीनपूर्वी राधिका आपटेशी अशी झाली होती चर्चा,आदिल हुसैनचा मोठा खुलासा  )

बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत हुमा कुरेशीनं एका प्रश्नाला दिलेल्या उत्तरात ही इच्छा व्यक्त केली. कोणता बॉलिवूड अभिनेता एक चांगला राजकारणी होऊ शकतो? असा प्रश्न तिला विचारण्यात आला असता क्षणाचाही विलंब न करता हुमानं सोनू सूदचं नाव घेतलं. ‘अगदी प्रामाणिकपणे मला असं वाटतं की, सोनू सूद यांनी निवडणुकीसाठी (Election) उभं राहिलं पाहिजे. मी त्यालाच मतदान (Vote) करेन. त्यानं आपल्या देशाचा पंतप्रधान व्हावं अशी माझी इच्छा आहे. तो चांगला पंतप्रधान होईल,’ असं उत्तर तिनं दिलं.

सध्या हुमाही सोनी लिव्हवर (Sony Liv) 'महारानी' (Maharani) या वेबसीरीजमध्ये काम करत असून, राजकीय विषय असलेल्याया सीरीजला चांगली पसंती मिळत असून, हुमाच्या भूमिकेबद्दलही जोरदार चर्चाहोत आहे.

First published:

Tags: Bollywood, Coronavirus, Sonu Sood