मुंबई, 31 मे- सोशल मीडियावर सतत नवनवीन ट्रेंड येत असतात. इन्स्टाग्राम एखादा रील आला कि तो इतका व्हायरल होतो की अनेकांना त्यावर व्हिडीओ बनविण्याचा मोह आवरत नाही. फक्त सर्वसामान्य युजर्सच नव्हे तर सेलिब्रिटींनासुद्धा या रिल्स आणि ट्रेंडची भुरळ पडलेली दिसते. सध्या इन्स्टावर '"जिगल व्हिगल ड्रिबल (#moneydontjigglejiggle)." हा मजेशीर ट्रेंड सुरु आहे. यावर माधुरी दीक्षित (Madhuri Dixit), दिशा पाटनीसारख्या (Disha Patani) अनेक अभिनेत्रींनी सहभाग घेतला होता. यांनतर आता अभिनेत्री मलायका अरोरानेसुद्धा (Malaika Arora) हा ट्रेंड फॉलो करत एक बोल्ड स्टेप्स असलेला व्हिडीओ शेअर केला आहे.
अभिनेत्री,मॉडेल, आणि डान्सर असणारी मलायका अरोरा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सोशल मीडियावर सतत व्हिडीओ, रील्स आई ग्लॅमरस फोटो शेअर करून नेटकऱ्यांचं लक्ष वेधत असते. ती नेहमीच ट्रेंडिंग व्हिडीओवर रील्स बनविताना दिसून येते. आजही ती तितकीच ऍक्टिव्ह आहे. तिच्यासमोर नवख्या अभिनेत्रीसुद्धा फिक्या पडतात. सोशल मीडियावर मलायकाच्या पोस्ट तुफान व्हायरल होत असतात. आजही अभिनेत्रीने एक व्हिडीओ शेअर करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
View this post on Instagram
मलायका अरोराने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला एक व्हिडीओ शेअर केला आहे. वास्तविक हा एक इन्स्टा रील आहे. यामध्ये मलायका आपल्या गर्ल गॅंगसोबत "जिगल व्हिगल ड्रिबल."ट्रेंडवर डान्स करताना दिसत आहे. मालयकाच्या या बोल्ड डान्स स्टेप पाहून नेटकरी घायाळ होत आहेत. यावेळी मलायकाने शॉर्ट सिल्व्हर कलरचा शिमरी ड्रेस परिधान केला आहे. अभिनेत्रीचा हा लुक फारच ग्लॅमरस आहे. सोबतच पन्नाशीत मलायकाच्या डान्स स्टेप, फिटनेस आणि सौंदर्य पाहून भलेभले थक्क होत आहेत.
याआधी अभिनेत्री माधुरी दीक्षितने या ट्रेंडला फॉलो केलं होतं. माधुरीने रेड जम्पिंग सूटमध्ये अतिशय उंदीर व्हिडीओ बनविला होता. अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करत लिहिलं होतं, ''जिगल व्हिगल ड्रिबल."त्यांनतर अभिनेत्री दिशा पाटनीनेसुद्धा हा ट्रेंड फॉलो केला होता. अभिनेत्रीने कोरियोग्राफर डिम्पल कोटेचासोबत या ट्रेंडवर जबरदस्त डान्स स्टेप करत सर्वांनाच थक्क केलं होतं. त्यांनतर आता मलायकाचासुद्धा यामध्ये समावेश झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood News, Entertainment, Instagram, Malaika arora