मुंबई, 27 मे- अभिनेता कार्तिक आर्यन(Kartik Aaryan) सध्या खुपचं चर्चेत आहे. यापूर्वी करण जोहरच्या(Karan Johar) धर्मा प्रोडक्शन (Dharma Production) मधून त्याला बाहेर केल्यामुळे तो चर्चेत होता. तर आत्ता शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) रेड चिलीज एन्टरटेनमेंट मधून(Red Chillies Entertainment) बाहेर पडल्यामुळे तो चर्चेत आला आहे. मात्र रेड चिलीजमधून त्याने स्वतः काढता पाय घेतला आहे. इतकचं नव्हे तर त्याने साइनिंग अमाउंट देखील परत केला आहे.
कार्तिक आर्यन रेड चिलीज एन्टरटेनमेंटच्या ‘फ्रेडी’ या चित्रपटात काम करणार होता. त्यासाठी त्याला साईन करण्यात आलं होतं. मात्र त्याने या चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्याने साइनिंग अमाउंटदेखील परत करून टाकलं आहे.
View this post on Instagram
माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार, कार्तिकला काही क्रीएटीव्ह अडचणी होत्या. तसेच तो या चित्रपटाच्या कथेबद्दल फारसा आनंदी नव्हता. गेल्या 15 दिवसांत स्क्रिप्टमध्ये इतकं वेगळेपण निर्माण झालं होतं. की कार्तिकने दिग्दर्शक अजय बहल यांच्याजवळ नाराजी व्यक्त केली होती. हा चित्रपट एका लव्हस्टोरीवर आधारित आहे. त्यामुळे कार्तिकला असं वाटतं होतं की त्याची सह अभिनेत्री कॅटरिना कैफ त्याच्यापेक्षा वयाने मोठी दिसेल.
View this post on Instagram
आणि शेवटी सहमताने कार्तिक आर्यनने या चित्रपटासाठी नकार दर्शवला आहे. तसेच रेड चिलीजने सुद्धा कार्तिकचा नकार मान्य केला आहे. ‘फ्रेडी’ या रेड चिलीजच्या चित्रपटासाठी कार्तिक आर्यनने 2 करोड रुपयांचा साइनिंग अमाउंट घेतला होता.
(हे वाचा: मिस मॅच' फेम मराठमोळ्या मृण्मयी कोलवलकरचा हॉट फोटोशूट, PHOTO पाहून चाहते सैराट )
यापूर्वी कार्तिक आर्यन करण जोहरच्या ‘दोस्ताना 2’ मधून बाहेर झाला होता. अभिनेत्री जान्हवी कपूर सोबत त्याने मोठ्या प्रमाणात शुटींगदेखील पार पाडली होती. मात्र क्रिएटीव्ह कारणांमुळे त्याला बाहेर पडावं लागलं होतं.
(हे वाचा:अभिनेता समीर परांजपेचा फिटनेस फंडा, VIDEO पाहून तुम्हीही पडाल प्रेमात )
सध्या कार्तिक जवळ कियारा अडवाणी सोबत ‘भूल भुलैय्या 2’ तसेच रोहित धवनच्या एका चित्रपटासाठी त्याला साईन करण्यात आलं आहे. त्याचबरोबर रॉनी स्क्रूवाला निर्मित ‘धमाका’ हा चित्रपट लवकरच ओटीटीवर रिलीज होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Kartik aryan