मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'Bhool Bhulaiyaa 2'च्या तुफान यशानंतर कार्तिक आर्यनने मानधन केलं डबल? एका चित्रपटासाठी घेणार इतके कोटी

'Bhool Bhulaiyaa 2'च्या तुफान यशानंतर कार्तिक आर्यनने मानधन केलं डबल? एका चित्रपटासाठी घेणार इतके कोटी

Kartik Aaryan

Kartik Aaryan

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Ayan) आज तरुणांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. त्याचा प्रचंड मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. 'धमाका' सारखा सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर तो अनीस बज्मीच्या हॉरर कॉमेडी 'भूल भुलैया 2' (Bhool Bhoolaiya 2) मध्ये झळकत आहे. हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 31 मे-   बॉलिवूड (Bollywood) अभिनेता कार्तिक आर्यन   (Kartik Ayan)  आज तरुणांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. त्याचा प्रचंड मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. 'धमाका' सारखा सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर तो अनीस बज्मीच्या हॉरर कॉमेडी 'भूल भुलैया 2'   (Bhool Bhoolaiya 2)  मध्ये झळकत आहे. हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत अवघ्या 9 दिवसांत 100 कोटींहून अधिकचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाच्या यशानंतर कार्तिक आर्यनने त्याच्या मानधनात वाढ केल्याचा दावा अनेक रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. मात्र, कार्तिकने आपल्या हटके अंदाजात अशा बातम्यांना अफवा ठरवून फेटाळून लावलं आहे.

कार्तिक आर्यन नेहमीच आपल्याबाबत होणाऱ्या चर्चांवर हटके स्टाईलने उत्तरे देत असतो. आजही अभिनेत्याने असंच काहीसं केलं आहे. कार्तिकने ट्विटरवर आपलं मानधन वाढविल्याच्या एका बातमीची लिंक शेअर करून त्यावर उत्तर दिलं आहे. अभिनेत्याने  ट्विटमध्ये लिहिलंय की, "आयुष्यात प्रमोशन झालं आहे.. इन्क्रिजमेंट नाही.. निराधार." त्याने त्याच्या कॅप्शनमध्ये हात जोडणाऱ्या आणि हसणाऱ्या इमोजीदेखील शेअर केल्या  आहेत. अशा अफवांचं  खंडन केल्याबद्दल चाहत्यांनी कार्तिकचं  कौतुक केलं आहे.

एका चाहत्याने ट्विट करत लिहिलंय, "लोक खोटे आरोप करतात, अफवा पसरवतात.. मला माहित आहे की तुम्ही त्यांच्यावर कधीही प्रतिक्रिया देत नाही आणि ए तुमच्या गप्प बसण्याला हलक्यात घेतात. शेवटी, ते पाहतात. लोक खोटंही इतक्या आत्मविश्वासाने बोलतात की सगळ्यांनाच ते सत्य मानावं लागतं.. लव्ह यू कार्तिक.. तू खूप छान करत आहेस." एका युजरने लिहिलंय की, “मानधनात वाढ झाली असली तरी त्यात गैर काय…. तुम्ही एक अद्भुत काम केलं आहे. तुम्ही त्यास पात्र आहात...” असं म्हणत कार्तिक आर्यनच्या चाहत्यांनी त्याचं कौतुक केलं आहे.

(हे वाचा:सिद्धू मूसेवाला यांना असा साजरा करायचा होता आपला वाढदिवस, प्लॅनही होता तयार )

रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलं होतं की, कार्तिक आर्यन एका चित्रपटासाठी 15-20 कोटी रुपये घेतो. बॉक्स ऑफिसवर 'भूल भुलैया 2' च्या यशानंतर त्याने प्रत्येक चित्रपटाची फी 35-40 कोटी रुपये केली आहे. म्हणजेच कार्तिक आता एका चित्रपटासाठी पूर्वीपेक्षा दुप्पट फी आकारणार आहे.वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर 'भूल भुलैया 2'पूर्वी कार्तिक आर्यन 'धमाका'मध्ये दिसला होता. कार्तिकने नुकतंच शेहजादा'चं शूटिंग पूर्ण केलं आहे. यामध्ये त्याच्यासोबत  क्रिती सेनन आहे. कार्तिककडे 'कॅप्टन इंडिया' हा चित्रपटदेखील आहे. जिथे तो पायलटच्या भूमिकेत दिसणार आहे आणि तो 'फ्रेडी'मध्येही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

First published:

Tags: Bollywood News, Entertainment, Kartik aryan