मुंबई, 5 नोव्हेंबर : बॉलिवूडचे प्रसिद्ध प्लेबॅक गायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायण लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. आदित्यच्या लग्नावरून यापूर्वी अनेक चर्चा रंगल्या होत्या. परंतु नुकतंच त्याने आपल्या होणाऱ्या बायकोबरोबरचा फोटो शेअर केला आहे. अनेक वर्षांपासून अभिनेत्री श्वेता अग्रवालला डेट करत असल्याचंही त्याने सांगितलं आहे. आता आदित्यच्या रोका, या लग्नाआधी होणाऱ्या कार्यक्रमाचे फोटो समोर आले आहेत.
आदित्यच्या रोका कार्यक्रमाचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये आदित्य आणि त्याची होणारी बायको श्वेता आणि त्यांचं कुटुंब दिसत आहेत.
आदित्यने एक दिवसापूर्वीच आपल्या होणाऱ्या पत्नीसोबत फोटो शेअर केला होता. लग्नाची तयारी करण्यासाठी तो सोशल मीडियावरून ब्रेक घेत आहे.
"आम्ही लग्न करणार आहोत. मी जगातील सर्वांत लकी व्यक्ती आहे ज्याला 11 वर्षांपूर्वी श्वेता भेटली होती, आणि आता आम्ही डिसेंबरमध्ये लग्न करतोय. आम्ही दोघंही खूप संभवित व्यक्ती आहोत आणि आमचा असा विश्वास आहे की एखाद्याचे खासगी जीवन खासगी ठेवणंच चांगलं. लग्नाच्या तयारीसाठी मी सोशल मीडियावरून ब्रेक घेत आहे. आता डिसेंबरमध्ये भेटू. म्हटलं होतं ना - कधी नं कधी भेटशील तू कुठे तरी मला खात्री आहे." असं म्हणत आदित्यने हा फोटो शेअर केला आहे.