'आम्ही एकाच गोष्टीसाठी लढतोय...', एक्स बॉयफ्रेंडने दिला कंगनाला पाठिंबा

'आम्ही एकाच गोष्टीसाठी लढतोय...', एक्स बॉयफ्रेंडने दिला कंगनाला पाठिंबा

अभिनेत्री कंगना रणौतला (Kangana Ranaut) बॉलिवूडमधील दिग्गजांकडून होणाऱ्या विरोधादरम्यान तिचा एक्स बॉयफ्रेंड अभिनेता अध्ययन सुमन (Adhyayan Suman) चा कंगनाना पाठिंबा मिळाला आहे.

  • Share this:

मुंबई, 19 सप्टेंबर : अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) सध्या सोशल मीडियावर खासकरून ट्विटरवर खूप सक्रीय झाली आहे. तिच्या वक्तव्यांमुळे ती जवळपास रोज चर्चेत आहे. संजय राऊत यांच्याशी झालेली शाब्दिक चकमक, शिवसेनेवर तिने केलेली टीका, महाराष्ट्र सरकारवर केलेली टीका, बीएमसीने (BMC) तिच्या मुंबईतील कार्यालयावर केलेली कारवाई इ. या सर्व घटना गेल्या काही दिवसात घडल्या आहेत. बीएमसीने केलेल्या कारवाईनंतर शिवसेनेला अनेकांकडून टीका सहन करावी लागली आहे. तर कंगनाविरोधात देखील काही बॉलिवूडकर एकवटले आहेत. दरम्यान कंगनाला बॉलिवूडमधील दिग्गजांकडून होणाऱ्या विरोधामध्येच तिचा एक्स बॉयफ्रेंड अभिनेता अध्ययन सुमन (Adhyayan Suman) चा कंगनाना पाठिंबा मिळाला आहे.

अध्ययनच्या मते, कंगना जर एखाद्या गोष्टीबाबत स्टँड घेत असेल तर त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असणार. India TV ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अध्ययन असे म्हणाला की, गेल्या 12 वर्षात ते दोघे संपर्कात नाही आहोत, मात्र आज ते दोघे एकाच कारणासाठी लढत आहेत. अध्ययन असे म्हणाला की, 'मी तिचा आदर करतो आणि हे समजतो की ती जे काही करत आहे, ज्याप्रकारे इंडस्ट्रीतील लोकांविरोधात बोलत आहे त्यामागे नक्कीच काहीतरी मोठे कारण असणार आहे.'

(हे वाचा-कशा अवस्थेत सापडला होता दिशाचा मृतदेह?रुग्णवाहिकेच्या ड्रायव्हरने केला हा खुलासा)

अध्ययन असे म्हणाला की, 'गेल्या बारा वर्षात माझ्यात आणि कंगनामध्ये काही बोलणे झाले नाही आहे. ती आज मोठी, प्रसिद्ध आणि यशस्वी अभिनेत्री आहे. तिने अशाप्रकारे समाजात येण्याचा निर्णय घेतला आहे तर त्यामागे काहीतरी कारण असणार. तिला पब्लिसिटीची गरज नाही आहे. हेच कारण आहे, ज्यामुळे ती बोलते आहे. हा पूर्णपणे तिचा निर्णय आहे आणि  मी त्याचा आदर करतो. '

(हे वाचा-Tiger 3: सात देशात होणार सलमान खानच्या या बिग बजेट सिनेमाचं शूटिंग)

तो पुढे म्हणाला की, 'जसे मी आधीच म्हणालो आहे की गेल्या बारा वर्षात आमच्यात कोणताही संपर्क नाही आहे. मात्र आयुष्याने आम्हाला अशा वळणावर आणले आहे की जिथे आम्ही एकमेकांच्या विरोधात नाही तर एकाच गोष्टीसाठी लढत आहोत. ज्याप्रकारे माझे वडील सुशांत सिंह राजपूतला (Sushant Singh Rajput) न्याय देण्याची मागणी करत आहेत, त्याचप्रकारे कंगना देखील करत आहे'.

Published by: Janhavi Bhatkar
First published: September 19, 2020, 9:54 AM IST

ताज्या बातम्या