यामीच्या विवाह आउटफिटविषयी बोलायचं तर यामीने साध्या पद्धतीने लग्न केलं असलं तरीही तिने नेहमीच्या लेहेंगा आउटफिटला फाटा देत मरुन रंगाची साडी परिधान केली होती. तर त्यावर क्लासिक लाल रंगाचा दुपट्टा तिने घेतला होता. याशिवाय आदित्यने बेबी पिंक शेरवानी परिधान केली होती. ते दोघेही य आउटफिट्समध्ये अतिशय सुंदर दिसत आहे.View this post on Instagram
नवे चेहरे बॉलिवूडसाठी सज्ज; पाहा कोण कोणत्या चित्रपटातून करणार पदार्पण
यामीच्या लग्नाची बातमी ब्रेक होताच इंटरनेटवर त्यांच्या फोटोंना लाइक्स मिळायला सुरुवात झाली. फोटो पोस्ट करत यामीने कॅप्शनही लिहीलं आहे. ती लिहीते, तुझ्या प्रकाशात मी प्रेम करायला शिकले..रुमी.. आमच्या कुटुंबियांच्या आशिर्वादाने आम्ही साध्या पद्धतीने लग्नगाठ बांधली आहे. वैयक्तिकरित्या आम्ही हा आनंदाचा क्षण कुटुंबासोबत साजरा करत आहेत. यामी आणि आदित्य यांनी ‘उरी : द सर्जीकल स्ट्राईक’ या चित्रपटात एकत्र काम करत होते. यामीने त्यात अभिनय केला होता. तर आदित्यने चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. याशिवाय आदित्य लवकरच आणखी एक चित्रपट दिग्दर्शित करणार आहे.मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Entertainment