• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • चित्रपटांपासून दूर असणारी पूजा बत्रा कशी कमावते कोट्यवधी रुपये? जाणून घ्या डिटेल्स

चित्रपटांपासून दूर असणारी पूजा बत्रा कशी कमावते कोट्यवधी रुपये? जाणून घ्या डिटेल्स

27 ऑक्टोबर 1976 रोजी उत्तर प्रदेशातील फैजाबाद येथे पूजा जन्म झाला. पूजाची आई मिस इंडिया या सौंदर्य स्पर्धेची स्पर्धक होती. आपल्या आईच्या पावलावर पाऊल ठेवून पूजानं देखील या स्पर्धेत सहभाग घेतला. 1993 मध्ये 'मिस इंडिया' (Miss India) ही सौंदर्य स्पर्धा जिंकल्यानंतर पूजानं 'मिस इंटरनॅशनल' स्पर्धेमध्ये देखील भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं.

 • Share this:
   मुंबई,27ऑक्टोबर- आजपर्यंत अनेक अभिनेत्रींनी बॉलिवुडमध्ये आपलं नशीब आजमवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातील काहींना यश आलं तर काहींना अपयश. काहींना तर दोन-तीन हिट चित्रपट मिळून देखील बॉलिवुडमध्ये आपलं स्थान पक्क करता आलं नाही. अशाच अभिनेत्रींमध्ये पूजा बत्रा (Pooja Batra) हीचं देखील नाव घेतलं जातं. पूजाला आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला हिट चित्रपट मिळून देखील तिला एका प्रस्थापित अभिनेत्रीचा दर्जा मिळवण्यात अपयश आलं. गेल्या काही वर्षांपासून ती बॉलिवुडपासून (Bollywood) दूर आहे. मात्र, तरी देखील ती एकदम लक्झरी लाईफ (Luxury life) जगत आहे. पूजा तिच्या हायक्लास जीवनशैलीमुळे नेहमीच चर्चेत असते. आज पूजा आपला 45वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्त, सध्या पूजा काय करते आणि तिची आर्थिक कमाई कशाच्या माध्यमातून होते, याची माहिती देणारं वृत्त दैनिक भास्करनं प्रसिद्ध केलं आहे.
  27 ऑक्टोबर 1976 रोजी उत्तर प्रदेशातील फैजाबाद येथे पूजा जन्म झाला. पूजाची आई मिस इंडिया या सौंदर्य स्पर्धेची स्पर्धक होती. आपल्या आईच्या पावलावर पाऊल ठेवून पूजानं देखील या स्पर्धेत सहभाग घेतला. 1993 मध्ये 'मिस इंडिया' (Miss India) ही सौंदर्य स्पर्धा जिंकल्यानंतर पूजानं 'मिस इंटरनॅशनल' स्पर्धेमध्ये देखील भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्यानंतर तिनं एक मॉडेल म्हणून करियरची सुरुवात केली. अल्पावधीतचं पूजाचं नाव भारतातील टॉप मॉडेल्सच्या यादीमध्ये आलं. तिच्या मॉडेलिंग करत असताना पूजानं 250 हून अधिक शो आणि अॅड केल्या होत्या. मॉडेलिंगमध्ये यश मिळवल्यानंतर पूजाला बॉलिवुडमधून अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. मात्र, आपलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी तिने सर्व ऑफर्स नाकारल्या. शिक्षण पूर्ण केल्यानंतर पूजाने 'विरासत' हा चित्रपट साइन केला. तिचा पहिलाच चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला. यानंतर तिनं भाई, हसीना मान जायेगी, कही प्यार ना हो जाए, नायक या चित्रपटांमध्ये काम केलं. पूजाने हिंदी, तमीळ, तेलुगु आणि मल्याळम भाषांमधील सुमारे ३० चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र, तिला एक प्रस्थापित अभिनेत्रीचा दर्जा मिळवता आला नाही. काही काळानंतर ती इंडस्ट्रीपासून दूर गेली. पूजानं 2002 मध्ये सोनू अहलुवालिया नावाच्या एका एनआरआय डॉक्टरशी लग्न केलं होतं. 2011 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतल्यानं हे लग्न मोडलं. यानंतर 2017 मध्ये तिनं बॉलिवुडमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. तिनं 'मिरर गेम' या चित्रपटात काम केलं. हा चित्रपट काही कमाल करू शकला नाही. 2019 मध्ये पूजानं पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला. 'टायगर जिंदा है' या चित्रपटात काम केलेल्या नवाब शाहसोबत आर्य समाजाच्या रितीरिवाजानुसार लग्न केलं. चित्रपटांपासून दूर असली तरी सोशल मीडियावरील बोल्ड फोटो आणि लक्झुरियस लाइफस्टाईलमुळे पूजा नेहमीच चर्चेत असते. पूर्णवेळ अभिनयापासून दूर गेलेल्या पूजानं विविध व्यवसायांच्या माध्यमातून आपली कमाई सुरू ठेवलेली आहे. आपल्या व्यवसायांच्या माध्यमातून ती कोट्यवधींची कमाई करते. पूजाच्या हातामध्ये अनेक कमर्शियल अॅड आणि ब्रँड एंडोर्समेंट डील आहेत. आपल्या सोशल मीडिया हॅन्डलवर ती अनेक मोठ्या ब्रँडसाठी एंडोर्समेंट करते. त्यातून देखील तिची कमाई होते. याशिवाय 2009 मध्ये, तिनं GlowBellinc नावाची प्रॉडक्शन कंपनी सुरू केलेली आहे. ही कंपनी हॉलिवुड आणि बॉलिवुड यांच्यामध्ये दुवा म्हणून काम करते. 2009 मध्येचं पूजाच्या प्रॉडक्शन हाऊसनं सिल्वेस्टर स्टॅलोन आणि डेनिस रिचर्ड्स यांसारख्या ए-लिस्टर हॉलिवूड कलाकारांना 'कंबख्त इश्क' चित्रपटाच्या निमित्त बॉलिवुडमध्ये आणण्याची कमाल केली होती. त्यानंतर 'चांदनी चौक टू चायना'मध्ये रॅपर बोहेमिया आणि फोर लिफ्सची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निकोल किडमन यांना देखील बॉलिवुडमध्ये आणलं. (हे वाचा:VIDEO:रोहित शेट्टीने 'सूर्यवंशी'मधून रणवीरचा रोल कट करण्याची दिली धमकी; वाचा....) 2010 मध्ये, तिच्या कंपनीनं भारतात एलए (LA) कास्टिंग आणि मॉडेल वायर लाँच करण्यास मदत केली. 2014 मध्ये, पूजाच्या प्रॉडक्शन हाऊसची निर्मिती असलेल्या 'जल' या चित्रपटानं ऑस्करपर्यंत मजल मारली होती. त्याठिकाणी त्यांनी एक प्रसिद्धी मोहीमही राबवली होती. याशिवाय, अमेरिकेतील आघाडीचं हिंदी रेडिओ स्टेशन असलेल्या 'मेरा संगीत-एलए'ची ती प्रोड्युसिंग पार्टनर देखील आहे. 2019मध्ये आयडॉल नेटवर्कनं दिलेल्या अहवालानुसार, पूजा बत्राची एकूण संपत्ती सुमारे 77 दशलक्ष डॉलर्स इतकी आहे. 2020 मध्ये तिची नेटवर्थ 1.8 दशलक्ष डॉलर्स इतकी होती तर 2021 मध्ये हा आकडा दुप्पट झाला. सध्या पूजाची नेटवर्थ 2.7 दशलक्ष डॉलर्स इतकी आहे. पूजाची मुंबई आणि लॉस एंजेलिसमध्ये आलिशान घरं आहेत. व्यवसायाव्यतिरिक्त पूजा सामाजिक कार्यांमध्ये देखील सक्रिय आहे. अनेक चॅरिटेबल ऑर्गनायझेशनसोबत ती काम करते. अनेक निराधार मुलांच्या मोफत शिक्षणासाठी ती निधी उभारण्याचं काम करते.
  First published: